कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्रालये/ विभागांच्या सीपीजीआरएएमएस विषयक कामगिरी बाबतचा सप्टेंबर 2023 या वर्षासाठीचा 17 वा अहवाल प्रकाशित


सप्टेंबर 2023 महिन्यात केंद्रीय मंत्रालये / विभागांनी 1,06,810 तक्रारींचा केला निपटारा

Posted On: 10 OCT 2023 11:29AM by PIB Mumbai

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) मध्यवर्ती सार्वजनिक तकार निवारण आणि देखरेख व्यवस्थेच्या सप्टेंबर 2023, महिन्याच्या कामगिरीचा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात, सार्वजनिक तक्रारींचे सविस्तर विश्लेषण आणि सार्वजनिक तक्रारींच्या विविध श्रेणी आणि निवारणाच्या पद्धती विशद करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्रालये / विभाग यांचा डी ए आर पी जी यांनी प्रसिद्ध केलेला हा 17 वा अहवाल आहे.

सप्टेंबर 2023, ची प्रगती, या महिन्यात एकूण  1,06,810 तक्रारींचे निवारण झाल्याचे दर्शवत आहे. या वर्षात म्हणजेच जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मंत्रालये/विभागांनी केलेल्या तक्रार निवारणाचा सरासरी कालावधी 19 दिवस इतका होता. हे अहवाल, डीएआरपीजी ने तक्रार निवारणाच्या कामात सुधारणा आणि गती आणण्यासाठी स्वीकारलेल्या 10 व्या टप्प्यात सीपीजीआरएएमएस सुधारणांचा भाग आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी कानपूर यांनी विकसित केलेल्या आय जी एम एस च्या दुसऱ्या टप्प्याचे आणि ट्री डँशबोर्डच्या स्वयंचलित विश्लेषण प्रणालीचे 29 सप्टेंबर 2023 उद्घाटन केले होते. ही स्मार्ट तक्रार देखरेख व्यवस्था आय आय टी कानपूर ने, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांच्या मदतीने अत्याधुनिक करण्यासाठी केलेल्या कराराअंतर्गत विकसित केल्या आहेत. हा बोर्ड दाखल झालेली तक्रार आणि त्याचे निवारण, त्याचा राज्य निहाय, जिल्हा निहाय आणि मंत्रालय निहाय डेटा सगळी माहिती लिहिलेली असते. त्याशिवाय, हा बोर्ड संबंधित मंत्रालये आणि अधिकाऱ्यांना ह्या तक्रारीच्या मूळापर्यंत कसे पोहोचायचे, यासाठी देखील मदत करते.

सप्टेंबर 2023 डी ए आर पी जी च्या मासिक अहवालाची  ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

सप्टेंबर महिन्यात 109098 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, त्यापैकी  106810 तक्रारींचे निवारण करत आहे. आज म्हणजेच 30 सप्टेंबर 2023, रोजी 66835 इतक्या सार्वजनिक तक्रारी प्रलंबित आहेत.

केंद्रीय सचिवालयातील तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले असून, ऑगस्ट महिन्यात 63461 असलेल्या तक्रारींची संख्या सप्टेंबर महिन्यात 66835 इतकी झाली आहे.

सार्वजनिक तक्रार अपील :

सप्टेंबर 2023 या महिन्यात, 20868 अपिल्स प्राप्त झाल्या त्यापैकी 19640 अपिल्सचा निपटारा करण्यात आला.

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत प्रलंबित अपिलांची संख्या देखील वाढली असून ऑगस्ट महिन्यात 23030

असलेल्या अपिल्सची संख्या सप्टेंबर महिन्यात 24258 इतकी झाली आहे.

तक्रार निवारण मूल्यांकन आणि इंडेक्स - ऑगस्ट 2023

***

N.Meshram/R.Aghor/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1966417) Visitor Counter : 80


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu