संरक्षण मंत्रालय
व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुखपदाचा स्वीकारला पदभार
Posted On:
06 OCT 2023 6:33PM by PIB Mumbai
व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी 06 ऑक्टोबर 23 रोजी भारतीय नौदलाचे कार्मिक विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 01 जुलै 87 रोजी भारतीय नौदलामध्ये नियुक्ती झालेले फ्लॅग ऑफिसर स्वामीनाथन, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्राचे तज्ञ आहेत. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, यूकेच्या संयुक्त सेवा कमांड अँड स्टाफ कॉलेज, कारंजा येथील नौदल युद्ध महाविद्यालय, आणि अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, या संस्थांचे ते माजी विद्यार्थी आहेत.
अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त करणारे, अॅडमिरल स्वामीनाथन यांनी आपल्या भारतीय नौदालामधील कारकिर्दीत अनेक प्रमुख कार्यान्वयन, कर्मचारी आणि प्रशिक्षण पदांवर काम केले आहे. आयएनएस विद्युत आणि विनाश या क्षेपणास्त्र युद्ध नौका, क्षेपणास्त्र हल्ला करणारी आयएनएस कुलिश, मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक आयएनएस म्हैसूर आणि विमान वाहक आयएनएस विक्रमादित्य या युद्ध नौकांचे नेतृत्व केले आहे.
नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बीएससी पदवी घेतली. कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोची येथून दूरसंचार विषयात एमएससी, किंग्ज कॉलेज, लंडनमधून संरक्षण अभ्यासात एमए, मुंबई विद्यापीठातून स्ट्रॅटेजिक स्टडीजमध्ये एमफिल, आणि मुंबई विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पीएचडी अशी अॅडमिरल स्वामीनाथन यांची शैक्षणिक कारकीर्द आहे.
***
S.Bedekar/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1965190)
Visitor Counter : 132