रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने 2023 च्या पहिल्या दोन तिमाहीत 758.20 मेट्रिक टन मालवाहतूक केली
Posted On:
03 OCT 2023 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
भारतीय रेल्वेने एकत्रित आधारावर एप्रिल-सप्टेंबर 2023 या कालावधीत मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 21.52 मेट्रिक टनाची वृध्दी नोंदवत 758.20 मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत रेल्वेने सुमारे 736.68 मेट्रिक टन मालवाहतूक केली होती. रेल्वेने गेल्या वर्षीच्या 78991 कोटी रुपयांच्या तुलनेत सुमारे 2706 कोटी रुपयांची वृध्दी नोंदवत सुमारे 81697 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय करणे सुलभ बनवण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण करण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि सुलभ व्यावसायिक धोरण बनवण्यासाठी कार्यरत व्यवसाय विकास केंद्रांच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963861)
Visitor Counter : 90