सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
देशात विविध ठिकाणी स्वच्छता ही सेवा मोहिम
Posted On:
03 OCT 2023 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने 1 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरातील विविध ठिकाणी लोकचळवळीसह 273 स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले होते.या स्वच्छता मोहिमांचे आयोजन विभागाचे अधिकारी/कर्मचारी , राष्ट्रीय संस्था, केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि वैधानिक संस्था यांनी देशातील विविध ठिकाणी केले होते. या मोहिमेदरम्यान विभागा अंतर्गत आयोजित करण्यात आलेले प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
i.सहभागी झालेल्या सर्वांनी स्वच्छता प्रतिज्ञा घेतली.
ii.संकेतस्थळ आणि इतर योग्य ठिकाणी स्वच्छता ही सेवा या विषयावर विविध फलक आणि भित्तिपत्रके लावण्यात आली होती.
iii.संकुल परिसरात संपूर्ण स्वच्छता.
iv.वृक्षारोपण
v.स्वच्छता ही सेवा मोहिमेचा एक भाग म्हणून मानवी साखळी तयार करण्यात आली
vi.रेल्वे स्थानक, बाजारपेठा, समुद्रकिनारे, बस स्थानके , स्वयंसेवी संस्थांची संकुले , उद्याने, शाळा यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी विविध श्रमदान उपक्रम आयोजित करण्यात आले .
vii.पथनाट्याच्या माध्यमातून एकल वापराचे प्लास्टिक टाळण्यासाठी आणि कचऱ्याची विल्हेवाट यासंदर्भात स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात आली.
viii.सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान, कार्यक्रमाची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून स्वच्छता ही सेवा पोर्टलवर अपलोड करण्यात आले. विभाग आणि त्याच्या संस्थांद्वारे कार्यालयाच्या आतील आणि बाहेरील परिसरात साफसफाई, जुन्या नोंदीच्या फायलींचा निपटारा यांसारखे स्वच्छता उपक्रम राबवण्यात आले.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यादरम्यान आणि 1.10.2023 रोजी आयोजित काही उपक्रम-
1.विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली स्वच्छता प्रतिज्ञा
2.मध्य प्रदेशातील टीकमगड रेल्वे स्थानकात सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार आणि इतर अधिकारी/कर्मचारी आणि स्वयंसेवकांद्वारे श्रमदान
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963828)
Visitor Counter : 115