उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

Posted On: 01 OCT 2023 6:11PM by PIB Mumbai

 

गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गांधी जयंतीनिमित्त सर्व देशवासियांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना  शुभेच्छा देतो.

महात्मा गांधींच्या  सत्य (सत्याग्रह) आणि अहिंसा (अहिंसा) या तत्वांनी  वसाहतवादी राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मार्गदर्शक भूमिका बजावली.   स्वातंत्र्य आणि समानतेसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न केवळ भारतासाठीच नाही तर जागतिक समुदायासाठी - न्याय्य आणि सुसंवादी समाजाच्या स्थापनेत एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहेत.

राष्ट्रपित्यांना आदरांजली वाहताना, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचा आणि भारताच्या  प्रगतीसाठी गांधीजींच्या आत्मनिर्भरता, सर्वसमावेशकता आणि वैश्विक बंधुभावाचा दृष्टिकोन  कायम राखण्याचा  प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितले आहे.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962891) Visitor Counter : 98


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil