गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एक तारीख एक घंटा एक साथ: बापूंना स्वच्छांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

Posted On: 30 SEP 2023 7:45PM by PIB Mumbai

 

देशभरात स्वच्छता पंधरवडा - स्वच्छता ही सेवा - 2023 ची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक तारीख एक घंटा एक साथया आवाहनाची पूर्तता करण्यासाठी नागरिक सज्ज झाले असून  स्वच्छतेच्या माध्यमातून बापूंना आदरांजली वाहण्याचा संकल्प केला आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत स्वच्छ भारत मिशन शहरीचे उद्दिष्ट  शहरे कचरामुक्त करणे हे आहे. मुंबईत ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यात आला त्याप्रमाणेच स्वच्छता पंधरवडा हा स्वच्छतेचा उत्सव देखील साजरा करण्यात आला . मुंबईत गणेशपूजेप्रमाणेच स्वच्छता पंधरवडा देखील त्याच  उत्साहात साजरा केला जात आहे.

17 सप्टेंबर रोजी झालेल्या इंडियन स्वच्छता लीग  2.0 साठी महाराष्ट्रातील नागरिकांचा सहभाग अतिशय चित्तवेधक होता. संपूर्ण स्वच्छता पंधरवड्यात लोकांनी उत्साहाने आणि हिरीरीने  सहभाग घेतला आणि शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात स्वच्छतेसाठी सहकार्य केले. गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाद्वारे उपलब्ध  पोर्टलच्या (https://swachhatahiseva.com/) माध्यमातून नागरिक त्यांच्या आवडत्या ठिकाणांहून 1 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्वच्छतेमध्ये सहभागी होतील.. ते प्रत्यक्ष त्या ठिकाणाहून छायाचित्र काढू शकतील आणि पोर्टलवर देखील अपलोड करू शकतील.  नागरिक  1 ऑक्टोबर रोजी जलाशय , प्रार्थनास्थळे, खाजगी व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बसस्थानक, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी स्वच्छतेद्वारे  मोठे योगदान देतील.

हिंगोली नगरपरिषदेने  जिथे लोक उघड्यावर कचरा टाकतात त्या ठिकाणी स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्यासाठी  ती जागा दत्तक घेतली आहे. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून तिथे  बसण्यासाठी काही बाकही बसवणार आहेत. हिंगोलीचे हनुमान मंदिर  याकडे विशेष भर असेल.  तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व निवडणूक प्रभागातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 1 ऑक्टोबरपूर्वी शहर स्वच्छ करण्यासाठी एक तासाची संकल्पना सुरू करण्यात आली होती. लोकांनी या संकल्पनेचे केवळ कौतुक केले नाही तर लोक या उपक्रमात उत्साहाने सहभागी देखील होत आहेत.

स्वच्छ आणि हरित पर्यावरण ही शाश्वत विकासाची मूलभूत विचारधारा आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. नागरिक आपली घरे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र पर्यावरणाची स्वच्छता ही देखील  आपली जबाबदारी आहे हे ते विसरतात.  शिरोळ शहरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झालेले  दिसून आले. 1 ऑक्टोबरसाठी शिरोळ येथील श्री कल्लेश्वर तलाव, छत्रपती शिवाजी महाराज तख्त, पंचगंगा घाट आणि बुवाफण मंदिर परिसरातील  स्वच्छतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ही भव्य स्वच्छता मोहीम लोकांना जोडेल आणि निवडक प्रतिष्ठित वारसा, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठिकाणांवर लक्ष केंद्रित करेल. भव्य स्वच्छता मोहिमेसाठी देशभरात 8 लाखांहून अधिक ठिकाणे निवडण्यात आली आहेत.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962524) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil