रेल्वे मंत्रालय
स्वच्छता ही सेवा (एसएचएस) मोहिमेच्या पहिल्या 14 दिवसांत (म्हणजेच 15.09.23 ते 29.09.23) सुमारे 1934 उपक्रमांमध्ये 2.14 लाखांहून अधिक लोकांनी घेतला सहभाग
Posted On:
29 SEP 2023 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
विस्तृत देशव्यापी जाळ्यासह स्वच्छ भारत अभियानात भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालय 15.09.23 ते 02.10.23 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे. अधिक हरीत आणि पर्यावरणास अनुकूल रेल्वे प्रणालीला चालना देणे हा याचा उद्देश आहे. या वर्षी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसेच जलशक्ती मंत्रालयाने संयुक्तपणे ‘स्वच्छता हीच सेवा’ (एसएचएस) मोहीम (15.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत) सुरू केली आहे. रेल्वे मंत्रालय देखील याचा एक भाग आहे.एसएचएसचे उपक्रम स्वच्छता पंधरवड्याच्या दैनंदिन उपक्रमांच्या समन्वयनाने साजरे केले जात आहेत.‘कचरामुक्त भारत’ ही स्वच्छता ही सेवा अभियान 2023 ची संकल्पना आहे. हा उत्साह आणि पंतप्रधानांच्या मार्गदर्शनामुळे, भारतीय रेल्वेने 2014 च्या आधीच्या तुलनेत स्वच्छतेच्या संदर्भात एक आदर्श बदल केला आहे.
स्वच्छता हीच सेवा अभियान 2023 आणि स्वच्छता पंधरवडा 2023 चे उद्घाटन 15 सप्टेंबर 2023 रोजी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते रेल्वे भवनात स्वच्छतेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आले.

यंदा स्थानकांवरील रेल्वे मार्गांची स्वच्छता, प्रमुख स्थानकांपर्यंत पोहोचणारे भाग आणि रेल्वे आवारातील प्लास्टिक कचरा निर्मूलनावर विशेष भर देण्यात येत आहे.


यावर्षी स्वच्छता हीच सेवा (एसएचएस) मोहिमेच्या पहिल्या 14 दिवसांत (म्हणजेच 15.09.23 ते 29.09.23) सुमारे 1934 उपक्रमांमध्ये 2.14 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला यात 662990 मनुष्य-तासांचा समावेश आहे. प्रवासी आणि संबंधित घटक या उपक्रमात मनापासून सहभागी झाले.
1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता लोकांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींना आदरांजली म्हणून स्वयंसेवकांनी किमान एक तास श्रमदान करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवावी अशी रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. या भव्य स्वच्छता मोहिमेसाठी रेल्वेने देशभरात सुमारे 20,000 कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या स्वच्छता मोहिमेत श्रमदान करण्यासाठी मान्यवर, प्रख्यात तारेतारका, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स यांना आमंत्रित करण्यात येत आहे. www.swachhbharatmission.gov.in या SHS-2023 पोर्टलवरही या उपक्रमांचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962202)
Visitor Counter : 124