Posted On:
29 SEP 2023 10:26AM by PIB Mumbai
स्वच्छता हीच सेवा मोहिमे अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी “एक तारीख एक तास एकत्र” उपक्रमात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा सक्रीय सहभाग असणार आहे.


एमएसएमई मंत्रालयाने “एक तारीख, एक तास, एकत्र” या उपक्रमासाठी आपल्या अखत्यारीतील संस्थांद्वारे 200 पेक्षा अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC), खादी आणि ग्रामोद्योग (KVI), COIR मंडळ, MGIRI-वर्धा आणि NIMSME-हैदराबाद तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग-विकास सुविधा कार्यालये (MSME-DFOs) त्यांच्या देशव्यापी कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे यामाध्यमातून मोहिमेत सहभागी होतील.

एमएसएमई मंत्रालयाने हा उपक्रम अतिशय गांभीर्याने घेतला आहे आणि सचिव एस.सी.एल. दास या मोहिमेसाठी मंत्रालयातील विविध संस्थांमधील नोडल अधिका-यांसह आतापर्यंत झालेल्या प्रगतीचे निरीक्षण आणि पुनरावलोकन करत आहेत.
देशभर 1 ऑक्टोबर 2023 रोजी राबवल्या जाणाऱ्या संपूर्ण मोहिम आणि उपक्रमांच्या तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी मंत्रालयाने संयुक्त सचिव स्तरावरील नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. "कचरा मुक्त भारत" ही एसएचएस 2023 ची संकल्पना आहे. एमएसएमई मंत्रालय 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 23 या कालावधीत प्रलंबित प्रकरणे (SCDPM) 3.0 चा निपटारा आणि स्वच्छता हीच सेवा मोहिमेसाठी विशेष मोहिम राबवत आहे.
***
S.Thakur/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai