पंतप्रधान कार्यालय
डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र शोक व्यक्त
Posted On:
28 SEP 2023 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2023
सुप्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. डॉ. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या संशोधन कार्यामुळेच अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडले आणि देशाची अन्नसुरक्षाही सुनिश्चित होऊ शकली."
पंतप्रधानांनी त्यांच्याविषयी x माध्यमावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"डॉ. एम.एस. स्वामिनाथन’जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. देशाच्या इतिहासातील, अत्यंत महत्वाच्या वेळी, त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले महत्वाचे संशोधन, लक्षावधी लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे आणि आपल्या देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करणारे होतें."
कृषी क्षेत्रातील त्यांच्या या क्रांतिकारक योगदानाबरोबरच, डॉ. स्वामिनाथन हे नवोन्मेषाचे ऊर्जाकेंद्र आणि अनेकांचे प्रेरणास्रोत मार्गदर्शक होते. संशोधन आणि मार्गदर्शनाप्रती त्यांची ही अढळ निष्ठा, असंख्य शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषकावर अमीट छाप सोडणारी आहे.
डॉ. स्वामिनाथन यांच्या सोबतचा संवाद, माझ्या कायमच स्मरणात राहील. भारताच्या प्रगतीविषयीची त्यांची तळमळ अद्वितीय होती.
त्यांचे आयुष्य आणि कार्य येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देणारे ठरणार आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोक संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
M.Pange/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961707)
Visitor Counter : 104
Read this release in:
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada