पर्यटन मंत्रालय
पर्यटन मंत्रालयाकडून 'ट्रॅव्हल फॉर लाइफ' उपक्रमाचा जागतिक स्तरावर प्रारंभ
Posted On:
27 SEP 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2023
2023 च्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त,भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने आज पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्या सहकार्याने नवी दिल्लीत भारत मंडपम येथे पर्यावरण अनुकूल जीवनशैली : लाइफ अंतर्गत पर्यटन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या 'ट्रॅव्हल फॉर लाइफ' उपक्रमाचा जागतिक स्तरावर प्रारंभ केला.
पर्यटन मंत्रालयाने अलीकडे सुरु केलेले उपक्रम म्हणजे शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठीच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी यावेळी सांगितले. नवी दिल्लीत नुकत्याच संपन्न झालेल्या जी 20 प्रमुखांच्या बैठकीत जागतिक एकता आणि सहयोग याविषयीच्या भारताच्या प्रतिबद्धतेचे दर्शन घडले आणि एका शाश्वत भविष्यासाठी सर्व प्रतिनिधींनी सर्व राष्ट्रांच्या एकत्रित महत्वाकांक्षांना अधोरेखित केले, असे भट्ट यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक पर्यटकाने, प्रत्येक उद्योगाने आणि प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाअंतर्गत असलेल्या विचारांना अनुसरावे, एक जबाबदारीने पर्यटन करावे, आपल्या पर्यावरणाचा आदर राखावा आणि आपल्या विश्वाला नितांत सुंदर बनवणाऱ्या या वैविध्यपूर्ण संस्कृतीला समजून तिचा सन्मान करावा, असे आवाहन त्यांनी केले. ट्रॅव्हल फॉर लाइफ कार्यक्रम LiFE (पर्यावरण अनुकूल जीवनशैली) या संकल्पनेतून साकार झाला असून तो आपल्या वसुंधरेच्या शाश्वततेचा मार्ग निश्चित करत आहे, असे भट्ट यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या आणि पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या गावांना सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण 35 ग्रामीण पर्यटन पुरस्कारप्राप्त गावांपैकी अनुक्रमे 5, 10 आणि 20 गावांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांनी सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त गावांची यादी
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1961382)
Visitor Counter : 142