वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

केंद्र सरकारने निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेअंतर्गत दिले जाणारे सहाय्य 30 जून 2024 पर्यंत वाढवले

Posted On: 26 SEP 2023 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

30 सप्टेंबर 2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आलेले  निर्यात उत्पादनांवर शुल्क आणि कर सवलत योजना  सहाय्य  आता विद्यमान निर्यात वस्तूंसाठी समान दराने 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आले आहे. हे आपल्या निर्यातदार समुदायाला सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात चांगल्या अटींवर निर्यात कराराच्या वाटाघाटी करण्यास मदत करेल. ही योजना जागतिक व्यापार संघटनेशी सुसंगत आहे आणि ती संपूर्णपणे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे  लागू केली जात आहे.

आणखी एक घडामोड म्हणजे, योजनेच्या चौकटीच्या अनुषंगाने, विविध निर्यात क्षेत्रांसाठी निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेअंतर्गत   कमाल मर्यादा शुल्काचा आढावा घेण्यासाठी आणि शिफारस करण्यासाठी महसूल विभागात पुन्हा निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजना समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने आज नवी दिल्लीतील वाणिज्य  भवन येथे निर्यात प्रोत्साहन परिषद (ईपीसी )/चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याशी पहिली  चर्चा केली तसेच  योजना आणि योजनेच्या  अंमलबजावणीशी संबंधित कार्यपद्धती आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी निर्यात  प्रोत्साहन परिषदने त्यांच्या निरीक्षणांमध्ये निर्यात  उत्पादनांवरील शुल्क आणि कर सवलत योजनेची  आर्थिक तरतूद वाढवण्याच्या आणि सर्व निर्यात वस्तूंना परदेशात अधिकाधिक बाजारपेठ मिळवण्यास मदत करण्यासाठी त्यांना उच्च दर उपलब्ध करून देण्याच्या गरजेवर भर दिला.   

 

 

 

 

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961106) Visitor Counter : 129


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi