संरक्षण मंत्रालय

संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी नवी दिल्ली इथल्या बीआरओ मुख्यालयाला भेट दिली, मनाली इथल्या बीआरओ कॅफेचे केले ई-उद्‌घाटन

Posted On: 26 SEP 2023 8:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

संरक्षण  राज्यमंत्री अजय भट यांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीतील सीमा रस्ते महासंचालनालयाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यांनी अनेक पुस्तके, सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ ) उत्तराखंडमधील कामांचे संकलन-'नेशन्स बीआरओ: लूकिंग अहेड', बीआरओने  जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल विशेष दिवस टपाल पाकीट ,'वीर गाथा' - या बीआरओच्या अज्ञात वीरांवरील पुस्तकाचे  आणि अति उंचावरील समस्यांशी संबंधित वैद्यकीय पुस्तिकेचे  प्रकाशन केले. संरक्षण राज्यमंत्र्यांनी  मनाली  इथल्या बीआरओ  कॅफेचे देखील ई-उद्‌घाटन केले.

सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे   रस्ते आणि महामार्ग पूर्ण होण्यात लक्षणीय वाढ झाली असून सीमा रस्ते संघटनेच्या  कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचा हा पुरावा असल्याचे भट यांनी यावेळी सांगितले. दुर्गम डोंगराळ भागात पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या सुंदर ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या रस्त्यांवर पर्यटकांना मैत्रीपूर्ण आणि सुरक्षित वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी या भागातील प्रमुख पर्यटन सर्किट्ससह सुविधा आणि मूलभूत वैद्यकीय सुविधा देणारे बहुउपयोगी कॅफे उभारण्याची गरज भासू लागली. यासंदर्भात बीआरओने   मनालीमध्ये  कॅफे बांधून आघाडीची भूमिका बजावली आहे,असे  ते म्हणाले.

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर उमलिंग ला पास येथे जगातील सर्वात उंच मोटार वाहन चालवण्यायोग्य रस्ता बांधल्याबद्दल आणि लडाखमध्ये  लिकरू - मिगला - फुकचे  येथे काम सुरू केल्याबद्दल संरक्षण राज्यमंत्र्यांनी बीआरओचे अभिनंदन केले.

 

S.Kane/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1961061) Visitor Counter : 90


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu