कृषी मंत्रालय
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या वतीने रब्बी हंगाम 2023-24 साठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
26 SEP 2023 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023
देशात 2015-16 पासून अन्नधान्य उत्पादनात वाढ होत आहे,असे कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा यांनी आज नवी दिल्लीत रब्बी हंगाम 2023-24 साठी आयोजित कृषी विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.तिसऱ्या अग्रीम अंदाजानुसार (2022-23), देशात अन्नधान्याचे उत्पादन 3305 लाख टन राहील असा अंदाज असून हे उत्पादन 2021-22 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 149 लाख टन अधिक आहे.तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, रॅपसीड आणि मोहरी, तेलबिया आणि उसाच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. 2022-23 मध्ये एकूण कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन अनुक्रमे 275 आणि 410 लाख टन इतके विक्रमी असल्याचा अंदाज आहे, असे मनोज आहुजा यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.



गेल्या 8 वर्षांत एकूण अन्नधान्य उत्पादन 31% वाढून 251.54 वरून 330.54 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. 2022-23 या वर्षासाठी तेलबिया आणि कडधान्य या कृषी उत्पादनांच्या निर्यातीचा हाच कल असून निर्यातीने 53.145 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, कृषी निर्यातीसाठीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.गेल्या दोन वर्षांतील ही कामगिरी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन साकार करण्यासाठी खूप पुढे घेऊन जाईल, असे सचिवांनी सांगितले.

मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा घेणे आणि मूल्यांकन करणे आणि राज्य सरकारांशी सल्लामसलत करून रब्बी हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्टे निश्चित करणे, पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करणे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. रासायनिक घटकांचा वापर कमी करून कृषी-पर्यावरण आधारित पीक नियोजनाला सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1960993)
आगंतुक पटल : 214