इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यात उद्या आयोजित 9 व्या रोजगार मेळाव्याला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर राहणार उपस्थित

Posted On: 25 SEP 2023 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2023  

 

केंद्रीय कौशल्य विकास , उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर उद्या पुण्यातील यशवंतराव चव्हाण ॲकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट येथे आयोजित 9 व्या रोजगार मेळ्याला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत नवनियुक्त  51,000 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करतील.

नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन मॉड्यूल, कर्मयोगी प्रारंभ द्वारे त्यांचे कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही डिव्हाइसवरून आणि कोणत्याही ठिकाणाहून शिक्षण घेता येईल असे 680 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम या मोड्यूलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश समर्थित उपक्रमात सामावून घेतले जाणार आहे.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1960650) Visitor Counter : 119