संरक्षण मंत्रालय

अमेरिकेतल्या अलास्का येथील फोर्ट वेनराईट, येथे सुरू होणाऱ्या "युद्ध अभ्यास-23” साठी भारतीय पथक रवाना

Posted On: 24 SEP 2023 4:48PM by PIB Mumbai

 

"युद्ध अभ्यास" हा 19 वा  सैन्य सराव  25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अमेरिकेतल्या अलास्का येथील फोर्ट वेनराईट, येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय लष्कर आणि अमेरिकेच्या सैन्य दलाने  संयुक्तपणे आयोजित केलेला हा वार्षिक सराव आहे. या  सरावाची मागील आवृत्ती भारतातल्या उत्तराखंड मधील औली येथे नोव्हेंबर 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

सरावाच्या या आवृत्तीत, 350 जवानांचा समावेश असलेले भारतीय लष्कराचे पथक  सहभागी होणार आहे. या सरावात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटशी संलग्न बटालियन भारतीय लष्कराचे नेतृत्व करेल. यावेळी दोन्ही देशांचे सैन्यदल संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेमध्ये आंतरसंचालन वाढविण्यासाठी आवश्यक सामरिक कवायतींच्या मालिकेचा सराव करतील. तसेच दोन्ही बाजूंचे सहभागी लष्करी अधिकारी परस्पर अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी तपशीलवार चर्चा करतील. संयुक्त राष्ट्रांच्या आदेशाच्या भाग VII अंतर्गत 'पर्वत रांगा/अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीत एकात्मिक युद्ध  पथकाची तैनाती ' ही या सरावाची संकल्पना आहे.

कमांड पोस्ट सराव आणि निवडक  विषयांवर तज्ञ शैक्षणिक चर्चा देखील करतील.

या सरावामध्ये युद्ध  अभियांत्रिकी, अडथळे दूर करणे, खाण आपत्ती यासह युद्ध  कौशल्यांविषयी विस्तृत माहिती देणाऱ्या कवायतींमध्ये विचारांची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींचा समावेश असेल. "युद्ध अभ्यास-23" सरावामुळे दोन्ही सैन्यांना एकमेकांकडून शिकण्यास आणि दोन्ही सैन्यांमधील संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळेल.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1960179) Visitor Counter : 201


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil