आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य प्रणालींच्या प्रतिरोधकक्षमतेला बळकटी देणारा संयुक्त आराखडा विकसित करण्यासंदर्भात राष्ट्रीय शहरी आरोग्य परिसंवादाचे केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी भूषवले अध्यक्षपद
Posted On:
22 SEP 2023 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023
आरोग्य प्रणालींच्या प्रतिरोधकक्षमतेला बळकटी देणारा संयुक्त आराखडा विकसित करण्यासंदर्भात नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शहरी आरोग्य परिसंवादाचे केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी आज अध्यक्षपद भूषवले. यावेळी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी देखील उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, आरोग्य सचिवांनी शहरी पातळीवर प्राथमिक आणि द्वितीयक आरोग्य जाळे बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. महाराष्ट्र आणि गुजरातमधील शहरी स्थानिक शासन संस्थांनी(ULB) त्या त्या राज्यांमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यामध्ये लक्षणीय परिणाम केला असल्याचे उदाहरण देत त्यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या सहभागाने आणि प्रयत्नांनी आरोग्य सेवांच्या स्थितीत सुधारणा होईल आणि त्याच वेळी आरोग्य सेवा अधिक किफायतशीर होतील आणि शहरी नागरिकांसाठी त्या सहज उपलब्ध होणाऱ्या असतील, यावर भर दिला.
एकत्र काम करण्यामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार आणि राष्ट्रीय/ राज्य पथके एक ताळमेळ निर्माण करतील ज्यामुळे शहरी लोकसंख्येसाठी शाश्वत, निरोगी आणि सुरक्षित शहरी वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सेवांच्या वितरणातील तफावत भरून काढण्याचे आवाहन त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले. आपली शहरी आरोग्यसेवा परिसंस्था बळकट करण्यासाठी भक्कम सहकार्याची उभारणी करणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींबाबत संवाद करण्याला आणि सर्वोत्तम पद्धतींची परस्परांमध्ये देवाणघेवाण करण्याला त्यांनी प्रोत्साहन दिले.
शहरी वर्तुळातील आरोग्यसेवांना शाश्वत पद्धतीने बळकटी द्यावी, जेणेकरून शहरी लोकसंख्येला त्यांच्या बदलणाऱ्या गरजांची पूर्तता त्यांना हव्या त्या पद्धतीने करता येईल, असे मनोज जोशी यांनी सांगितले.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1959624)
Visitor Counter : 123