दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

ट्राय ने “राष्ट्रीय प्रसारण धोरण” तयार करण्यासाठी महत्वपूर्ण मुद्यांवरील पूर्व सल्लामसलत दस्तऐवज केला जारी

Posted On: 21 SEP 2023 7:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने आज "राष्ट्रीय प्रसारण धोरण" तयार करण्यासाठी महत्वपूर्ण मुद्यांवरील पूर्व सल्लामसलत दस्तऐवज जारी केला आहे.

13 जुलै 2023 रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ट्रायला राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 च्या कलम 11 अंतर्गत विचारात घेतलेले महत्वपूर्ण मुद्दे पाठवण्याची विनंती केली आहे.

भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि समृद्ध वारसा ज्यातून प्रतिबिंबित होऊ शकेल, तसेच डिजिटल आणि सक्षम अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताचे झालेले संक्रमण ज्यातून व्यक्त होऊ शकेल, अशा प्रसारण धोरणातून, प्रसारण क्षेत्राची कार्यशील, विविधरंगी आणि लवचिक दृष्टी  व्यक्त होणे आवश्यक आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. अपार संधी आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत अशी  दृष्टी, ध्येय, रणनीती आणि कृती निश्चित करणारे राष्ट्रीय प्रसारण धोरण, नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारण क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी आणि वाढीसाठी पोषक परिस्थिती निर्माण करु शकेल.

या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रीय प्रसारण धोरण तयार करण्यासाठी ज्या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक आहे, ते स्पष्ट करण्यासाठी सर्व भागधारकांशी पूर्व सल्लामसलत केली जात आहे. 10 ऑक्‍टोबर 2023 पर्यंत भागधारकांकडून पूर्व- सल्लामसलत दस्तऐवजावर लिखित टिप्पण्या/मते मागविण्यात आली आहेत. या टिप्पण्या advbcs-2@trai.gov.in आणि jtadvbcs-1@trai.gov या इमेल आयडीवर प्राधान्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवल्या जाऊ शकतात.

कोणतेही स्पष्टीकरण/माहितीसाठी अनिल कुमार भारद्वाज, सल्लागार (B&CS) यांच्याशी + 91-11-23237922 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो.    

 

R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1959495) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi