दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

प्रवेश शुल्क आणि बँक हमीसाठी तर्कसंगत- योग्य दर आकारण्‍यासाठी ‘ट्राय’कडून शिफारसी जारी

Posted On: 19 SEP 2023 10:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2023

 

‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज "प्रवेश शुल्क आणि बँक हमी यांची दर आकारणी तर्कसंगत- योग्य असावी, या संदर्भात शिफारशी जारी केल्या आहेत.

दूरसंचार विभागाने  (डीओटी ), पत्र क्र. 20-577/2016-AS-I Vol.III नुसार  3 मार्च 2022 रोजी ट्रायला एक पत्र पाठवले होते. यानुसार  दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध परवान्यांसाठी प्रवेश शुल्क आणि बँक हमी  यांचे दर  तर्कसंगत करण्यासाठी कळवले होते.

यानुसार ट्रायने दरविषयक विविध शिफारसी सूचवल्‍या आहेत. यामध्ये संभाव्य प्रवेशकर्त्यांनी बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक निश्चित रक्कम, प्रवेश शुल्क म्हणून  भरावी. हे  प्रवेश शुल्क सामान्यत: परत केले जाणार नाही. अशा प्रकारचा खर्च हा त्या कंपनीसाठी  ‘स्टार्ट-अप खर्च’ असतो. तसेच  बँक हमी म्हणजे   सरकारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आर्थिक साधन आहे. परवानाधारकाने त्याची देय रक्कम वेळेवर भरली आहे आणि परवाना करारामध्ये नमूद केलेल्या अटी आणि नियमांनुसार त्यांची जबाबदारी पूर्ण केली आहे, हे त्यातून स्पष्‍ट होते.

ट्रायच्या वतीने  दि. 26 जुलै 2022 रोजी “प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगतीकरण” या विषयावर  झालेल्या विचारविनिमयाच्या आधारावर एक संदर्भ  दस्तऐवज  जारी केला आहे. त्यावर  23 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर 2022 पर्यंत हितधारकांकडून लिखित टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या मागविण्यात आल्या होत्या.  उद्योग संघटनांच्या/ भागधारकांच्या विनंतीवरून, लेखी टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी सादर करण्याची अंतिम तारीख अनुक्रमे 6 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. प्राधिकरणाला विविध भागधारकांकडून 20 टिप्पण्या आणि 1 प्रति-टिप्पणी प्राप्त झाली. या सर्व टिप्पण्या आणि प्रति-टिप्पणी ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आभासी माध्‍यमाद्वारे 9 डिसेंबर 2022 रोजी या दस्तऐवजामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ‘ओपन हाऊस’  चर्चा  आयोजित करण्यात आली होती.

परवान्याच्या नूतनीकरणाच्या वेळी प्रवेश शुल्क न घेण्याची शिफारसही प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे  विद्यमान तसेच नवीन प्रवेशकर्त्यांवरील आर्थिक भार कमी होण्‍यास मदत होईल.  आणि विशेषतः यूएल (व्हीएनओ) परवानाधारकांसाठी लाभदायक ठरणार आहे.

“प्रवेश शुल्क आणि बँक हमींचे तर्कसंगत आकारणी ” याविषयी आलेल्या सर्व शिफारशींचा संपूर्ण मजकूर ‘ट्राय’ च्या www.trai.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध आहे. यासंदर्भात  स्पष्टीकरण हवे असेल /माहिती हवी असे तर,  अमित शर्मा, सल्लागार (F&EA) यांच्याशी advfea2@trai.gov.in किंवा दूरध्वनी क्रमांक +91-11-23234367 वर संपर्क साधता येईल.

 

* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958924) Visitor Counter : 92


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi