संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाकडून पश्चिम किनारपट्टीवर ‘ऑपरेशन सजग’ ही तटीय सुरक्षा कवायत

Posted On: 18 SEP 2023 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2023

 

'ऑपरेशन सजग', ही किनारपट्टी सुरक्षा रचनेतील सर्व भागधारकांचा समावेश असलेली कवायत, भारतीय तटरक्षक दलाने 18 सप्टेंबर 2023 रोजी पश्चिम किनारपट्टीवर राबवली. या कवायतीमुळे किनारपट्टी सुरक्षा यंत्रणेचे पुनर्प्रमाणीकरण करणे आणि समुद्रातील मच्छिमारांमध्ये जागरूकता निर्माण करणे सुलभ बनले. 

कवायती दरम्यान, समुद्रातील सर्व मासेमारी नौका, मालवाहू पडाव  आणि सागरी नावांच्या  कागदपत्रांची आणि क्रू पासची व्यापक तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. या कवायतीमध्ये सीमाशुल्क, सागरी पोलीस, बंदरे आणि भारतीय नौदलाच्या एकूण 118 जहाजांनी भाग घेतला.

किनारी सुरक्षा रचना  मजबूत करण्यासाठी मच्छिमारांसाठी बायोमेट्रिक कार्ड जारी करणे, प्रत्येक राज्यानुसार मासेमारी नौकांचे ठराविक कलर कोडिंग, मासे लँडिंग केंद्रांचे व्यवस्थापन तसेच प्रवेश/ निर्गमन चेक पॉईंट्सवर प्रवेश नियंत्रण, कोस्टल मॅपिंग, सुरक्षा संस्थांसाठी  विशिष्ट सागरी बँड फ्रिक्वेंसी नियुक्त करणे, भारतीय तटरक्षक दलाकडून सागरी पोलिस कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे यासारख्या अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 

सुरक्षा यंत्रणांना बायोमेट्रिक कार्ड रीडरही देण्यात आले आहेत. तटीय सुरक्षा रचना  अंतर्गत शिडाच्या होड्यांच्या देखरेखीशिवाय, बेट सुरक्षा आणि समुदाय संवाद कार्यक्रम देखील राबविण्यात आले.

दिवसभर चालणाऱ्या या  कवायतीचे प्रत्येक महिन्यात आयोजन केले जाते आणि यातून मिळालेली माहिती किनारपट्टीच्या सुरक्षा रचनेत  सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शक मानली जाते. या कवायतीमुळे किनारपट्टीच्या सुरक्षेतील महत्त्वाचे धडे मिळण्यासोबतच कल अधोरेखित करणे आणि विविध किनारी सुरक्षा उपायांच्या  अंमलबजावणीची पडताळणी करता येते.

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958639) Visitor Counter : 156


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil