पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारतातील चित्ता प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण
Posted On:
17 SEP 2023 2:04PM by PIB Mumbai
17 सप्टेंबर 2022 या दिवसाने भारतातील वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात इतिहास घडवून आणला. जगातील सर्वात वेगवान अशी ओळख असणारा जमिनीवरील प्राणी देशाच्या स्थानिक पातळीवर नामशेष झाल्यानंतर जवळपास 75 वर्षांनी भारतात परतला. भारतातून नामशेष झाल्याच्या दशकांनंतर, पहिल्यांदाच घडलेल्या आंतरखंडीय वन्यजीव स्थानांतरणात नामिबियातून आठ आफ्रिकन चित्ते (Acinonyx jubatus jubatus) मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित केले. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेतील बारा चित्त्यांचेही स्थलांतर करून फेब्रुवारी, 2023 मध्ये कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले.आपला नैसर्गिक खजिना पुनर्संचयित करण्याच्या भारताच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे चित्ते भारतासाठी अभिमानाचा घटक ठरले . हा संपूर्ण प्रकल्प नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि भारतातील सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ गटाच्या बारीक देखरेखीखाली राबविण्यात आला.
या कमी कालावधीच्या यशापशयाचे मूल्यमापन करण्यासाठी कृती आराखड्यात दिलेल्या 6 निकषांपैकी, या प्रकल्पाने चार निकषांची पूर्तता केली आहे, ते निकष म्हणजे स्थलांतरित करण्यात आलेल्या 50% चित्त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, त्यांच्या राहण्यासाठी अधिवासाची (होम रेंजची) स्थापना, कुनो अभयारण्यात शावकांचा जन्म आणि स्थानिक समुदायाच्या व्यक्तींना थेट चित्ता ट्रॅकर्सच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून आणि अप्रत्यक्षपणे कुनो अभयारण्याच्या आजूबाजूच्या भागातल्या जमिनीचे मूल्य वधारून या प्रकल्पाने महसूलात योगदान दिले आहे.
बहुतेक चित्ते हे भारतीय परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतले त्याचबरोबर शिकार करणे, शिकार केल्यानंतर त्याचे रक्षण करणे, स्वतःचा प्रदेश स्थापित करणे, यासारखे सामान्य बाबीही त्यांच्यामध्ये दिसून आल्या.
75 वर्षांनंतर भारतीय भूमीवर एका मादी चित्ताने शावकांना जन्म दिला आहे.
हा एक आव्हानात्मक असा प्रकल्प आहे आणि सुरुवातीचे संकेत उत्साहवर्धक आहेत. भारताच्या भूमीवर पुन्हा एकदा चित्त्याच्या येण्याने भारतातील कोरड्या गवताळ प्रदेशांच्या संवर्धनावर आवश्यक लक्ष केंद्रित केले जाईल आणि स्थानिक समुदायांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील. या प्रकल्पाच्या यशामुळे जगभरात वन्यजीवांच्या पुनर्स्थापनेच्या उपक्रमांची शक्यता निर्माण होईल. अशा आंतरखंडीय प्रयत्नांद्वारे हरवलेल्या, विलुप्त झालेल्या प्रजातींचा पुन्हा एकदा नव्याने परिचय करून देण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.
भारतातील चित्ता प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या एक वर्षाच्या स्मरणार्थ, आज मध्यप्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्क येथील सेसाईपुरा फॉरेस्ट कॉम्प्लेक्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर चीता प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. यावेळी सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत हिरो मोटोकॉर्प्स कंपनीच्या वतीने या चित्त्यांच्या देखरेखीसाठी काम करणाऱ्या कुनो येथील आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यात गतिशीलता येण्यासाठी 50 मोटारसायकल वाटप केल्या.
प्रकल्प चित्ता ने पहिल्या वर्षासाठी निर्धारित केलेली बहुतेक सर्व उद्दिष्टे आणि निकष साध्य केले आहेत आणि हा प्रकल्प योग्य दिशेने काम करत आहे.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958342)
Visitor Counter : 137