उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान
आपल्या सांस्कृतिक वारशाचा आदर करण्याचे आणि आपल्या प्रतिभावंत कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे उपराष्ट्रपतींचे माध्यमांना आवाहन
Posted On:
16 SEP 2023 7:18PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 5 हजार वर्षांहून अधिक जुन्या भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचा प्रसार करण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी माध्यमांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा आदर करण्याचे आवाहन केले आणि आपल्या कलाकारांचे रचनात्मक पद्धतीने संरक्षण, समर्थन आणि सहाय्य करण्याची गरज व्यक्त केली.
ते आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार प्रदान केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि अभिमान जपणाऱ्या व्यक्तींचा गौरव केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
आज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या 75 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व व्यक्तींची त्यांनी प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत पद्म पुरस्कारांद्वारे ज्यांचे योगदान सर्वांसमोर आले अशा अनेक अज्ञात नायकांचा उल्लेख करून, त्यांनी अशा व्यक्तींना या पुरस्काराने गौरवल्याबद्दल समाजात सर्वसहमती असल्याकडे लक्ष वेधले.
दिग्गज कलाकार हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे खरे रक्षक आणि शिल्पकार आहेत असे वर्णन करताना धनखड म्हणाले की, त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल फार पूर्वीच घेतली जायला हवी होती. जी -20 शिखर परिषदेदरम्यान जागतिक मंचावर भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली प्रदर्शनाचेही त्यांनी कौतुक केले आणि योग्य नेतृत्वासह 2047 मध्ये भारत जागतिक मंचावर शिखर गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
उपराष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण येथे पाहता येईल :
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1957973
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958066)
Visitor Counter : 170