मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली येथे 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा करणार प्रारंभ
Posted On:
16 SEP 2023 6:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे पीएम-विश्वकर्मा या केंद्रीय क्षेत्र योजनेचा प्रारंभ करणार आहेत. पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेतील निपुण कारागिरांना ओळख आणि सर्वांगीण मदत पुरवून त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, निर्मिती आणि व्याप्ती वाढवणे आणि त्यांना एमएसएमई मूल्य साखळींमध्ये सामावून घेणे हा या नव्या योजनेचा उद्देश आहे.
संपूर्ण सरकार या दृष्टिकोनांतर्गत, लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी उद्या देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे सत्तर ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. केंद्रीय मत्स्यउद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला हे उद्या कर्नाटक मधील मंगळूर येथे मत्स्यउद्योग , पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी परशोत्तम रुपाला उपस्थितांना संबोधित करतील तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधतील.
भारतात कला आणि हस्तकला यांचे विविध प्रकार असून ती प्राचीन आहे आणि मूल्ये आणि श्रद्धा याबाबतीत समृद्ध आहेत. पारंपारिक कारागीर आणि कलाकार , ज्यांना परंपरेनुसार ‘विश्वकर्मा’ म्हणून संबोधले जाते, ते कलात्मक क्षमतेने काम करतात, पारंपरिक साधने आणि तंत्रे वापरून आपल्या हातांनी वस्तू साकारतात. विश्वकर्मा हे या देशाचे निर्माते आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने, 16 ऑगस्ट 2023 रोजी संपूर्ण भारतात “पीएम विश्वकर्मा योजना” नावाची नवीन योजना लागू करायला मान्यता देऊन पारंपारिक कारागीर आणि कलाकारांसाठी एक दूरदर्शी निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत केंद्र सरकारने 18 पारंपारिक व्यवसायांचा समावेश केला आहे: मासेमारीचे जाळे विणणारे, शिंपी, परीट (धोबी), फुलांचे हार बनवणारे, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, टोपल्या/चटया /झाडू बनवणारे / काथ्यापासून वस्तू बनवणारे, कुंभार, शिल्पकार, पाथरवट (दगड फोडणारे), कुंभार, सोनार, कुलूप, हातोडी आणि टूलकिट बनवणारे, लोहार, सुतार, होडी बनवणारे इत्यादींचा समावेश आहे. लघुउद्योग आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासामध्ये होड्या आणि बनवणाऱ्यांची भूमिका महत्वपूर्ण असून ते आपल्या मासेमारी उद्योगाच्या सुरळीत कामकाजात मोठी भूमिका बजावतात आणि भारतीय सागरी मत्स्यव्यवसायाचा कणा म्हणून काम करतात.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे नोडल मंत्रालय आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958053)
Visitor Counter : 195