संरक्षण मंत्रालय

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखी चालना: सशस्त्र दलांसाठी 45,000 कोटी रुपयांच्या नऊ भांडवल अधिग्रहण  प्रस्तावांच्या एओएन ला संरक्षण अधिग्रहण  परिषदेची मंजुरी 

Posted On: 15 SEP 2023 4:16PM by PIB Mumbai

 

संरक्षण अधिग्रहण  परिषदेने (डीएसी) अंदाजे रु. 45,000 कोटी किमतीच्या नऊ भांडवल अधिग्रहण  प्रस्तावांना  गरजेची  स्वीकृती (एओएन) दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 15 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून, (भारतीय-देशांतर्गत डिझाइन केलेले, विकसित आणि उत्पादित (IDMM)/खरेदी  (भारतीय) श्रेणी अंतर्गत केली जाणार असून, यामुळे आत्मनिर्भर भारताचेउद्दिष्ट साध्य  करण्याच्या दिशेने भारतीय संरक्षण उद्योगाला मोठी चालना मिळेल.    

संरक्षण सज्जता, गतिशीलता, हल्ला करण्याची क्षमता आणि यांत्रिक दलाची टिकून राहण्याची क्षमता वाढावी, यासाठी संरक्षण संपादन परिषदेने हलकी चिलखती  बहुउद्देशीय वाहने (LAMV) आणि एकात्मिक तेहळणी यंत्रणा आणि लक्ष्यीकरण प्रणाली (ISAT-S) च्या खरेदीसाठी एओएन दिले आहे. लष्कराची हालचाल वेगाने करता यावी यासाठी, आणि तोफखाना आणि रडारच्या तैनातीसाठी डीएसी ने उच्च गतिशीलता वाहने (HMV) आणि गन टोइंग वाहनांच्या खरेदीसाठी एओएन ला मंजुरी दिली आहे.  

डीएसी ने भारतीय नौदलासाठी अत्याधुनिक सर्वेक्षण जहाजांच्या खरेदीलाही मान्यता दिली असून, त्यामुळे भारतीय नौदलाची सागरी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

डीएसी ने भारतीय हवाई दलासाठी देखील एओएन च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये हवाई कारवायांची अचूकता आणि विश्वासार्हता सुधारण्यासाठी डॉर्नियर विमानाच्या एव्हियोनिक अपग्रेड चा (हवाई कामगिरी श्रेणी सुधारणा) समावेश आहे.

स्वदेशी बनावटीच्या ALH Mk-IV हेलिकॉप्टरसाठी अचूक मार्गदर्शन करणारे एक शक्तिशाली स्वदेशी शस्त्र म्हणून धृवास्त्र या कमी पल्ल्याच्या हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या खरेदीलाही डीएसी ने मंजुरी दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून संबंधित उपकरणांसह 12 Su-30 MKI विमानांच्या खरेदीसाठी देखील एओएन देण्यात  आले.

बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वदेशीकरणाच्या दिशेने महत्वाकांक्षा वाढवण्याची हीच वेळ आहे.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1957868) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi