कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी स्वच्छता विशेष मोहीम 3.0 पोर्टलचा केला प्रारंभ
Posted On:
14 SEP 2023 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2023
नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज स्वच्छता मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठीच्या स्वच्छता विशेष मोहीम 3.0 साठी समर्पित वेब-पोर्टल, https://scdpm.nic.in, चा प्रारंभ केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी 20 शिखर परिषदेचे अभूतपूर्व यश आणि चांद्रयान-3 आणि आदित्य एल -1 सौर मोहीम या भारताच्या अंतराळ कामगिरीनंतर देश उत्साही वातावरणात असताना ही विशेष मोहीम सुरू केली जात आहे, असे डॉ जितेंद्र सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मे 2014 मध्ये पदभार स्विकारल्यानंतर 15ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेली पहिली जनजागृती मोहीम, स्वच्छता मोहिमेने चार प्राथमिक उद्दिष्टे साध्य केली आहेत. काही महिन्यांतच पंतप्रधानांनी स्वच्छता मोहिमेचे जन चळवळीत रूपांतर केले, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.
डॉ जितेंद्र सिंह यांनी सर्व नागरिकांना, विशेषतः प्रसारमाध्यमांना या संदर्भात जनजागृती करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
विशेष मोहीम 3.0 ही 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत पूर्वतयारीच्या टप्प्यात असेल.या कालावधीत, मंत्रालये/विभाग निवडलेल्या श्रेणींमधील प्रलंबित बाबी निश्चित करतील आणि मोहिम राबवण्यात येणाऱ्या ठिकाणे अंतिम करतील.
भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करण्यावर भर देऊन विशेष मोहीम 3.0 ची घोषणा केली आहे.विशेष मोहीम 3.0 मंत्रालये/विभाग आणि त्यांच्या संलग्न/अधिनस्त कार्यालयांव्यतिरिक्त सेवा वितरणासाठी जबाबदार असलेल्या किंवा सार्वजनिक इंटरफेस असलेल्या क्षेत्रीय /दूर ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर लक्ष केंद्रित करेल. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डीएआरपीजी ) हा विशेष मोहीम 3.0 च्या अंमलबजावणीसाठी नोडल विभाग आहे.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1957508)
Visitor Counter : 125