जलशक्ती मंत्रालय
पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच जलशक्ती मंत्रालय 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता आणि प्रलंबित संदर्भांचा निपटारा करण्यासाठी आयोजित विशेष मोहीम 3.0 मध्ये होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2023 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
संस्थात्मक स्वच्छता करणे आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबितता कमी करणे या उद्देशाने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विशेष मोहीम 3.0 राबविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) वर निर्देशित 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या मोहीम 3.0 मध्ये सहभागी होणार असून या मोहिमेच्या 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणार्या पूर्वतयारी टप्प्यात देखील हा विभाग सहभागी होत आहे.
2. पेयजल आणि स्वच्छता विभागाने (DDWS) 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयात प्रलंबित संदर्भांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि स्वच्छता प्रचारासाठीची विशेष मोहीम 2.0 मध्ये भाग घेतला होता. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विशेष मोहिमेच्या अंमलबजावणीच्या टप्प्यात, अति विशिष्ट (VIP) संदर्भ, आयएमसी संदर्भ, राज्य सरकार संदर्भ, पंतप्रधान कार्यालय (PMO ) संदर्भ, सार्वजनिक तक्रारी आणि सार्वजनिक तक्रारी अपील यासारख्या विविध श्रेणींमधील प्रलंबित प्रकरणे कार्यक्षमतेने निकाली काढण्यात आली आणि विशिष्ट फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले. या विशेष मोहिमेमुळे 600 चौरस फूट जागा मोकळी झाली होती. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाद्वारे (DARPG) तयार केलेल्या SCDPM पोर्टलवरही मोहिमेदरम्यानच्या उपलब्धी माहिती अपलोड करण्यात आली आहे. मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांना देखील यामध्ये सामील करून घेण्यात आले होते.
3. विशेष मोहीम 2.0 अंतर्गत घेण्यात येत असलेले प्रयत्न मोहिमेनंतर देखील नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत सुरू ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीतील प्रलंबित संदर्भ निकाली काढण्याच्या कामात मिळालेल्या यशांचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
(i) व्हीआयपी संदर्भ - 48
(ii) राज्य सरकार संदर्भ - 88
(iii) सार्वजनिक तक्रारी - 3428
(iv) सार्वजनिक तक्रार अपील - 215
4. आता, पेयजल आणि स्वच्छता विभाग (DDWS) 2 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या विशेष मोहीम 3.0 मध्ये आणखी सक्रियपणे सहभागी होण्याची तयारी करत आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1957177)
आगंतुक पटल : 147