कोळसा मंत्रालय
स्वच्छता मोहिमेअंतर्गत कोळसा मंत्रालय आणि सार्वजनिक उपक्रमांकडून 10,266 मेट्रिक टन भंगाराची विल्हेवाट; जानेवारी ते ऑगस्ट 2023 पर्यंत 70 कोटी रुपयांच्या महसुलाची निर्मिती
6,929,401 चौरस फूट जागा मोकळी ; पर्यावरणस्नेही तागाच्या /कापडी पिशव्यांचे वाटप
Posted On:
13 SEP 2023 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 सप्टेंबर 2023
कोळसा मंत्रालय आणि कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी स्वच्छता पंधरवडा -2023 चा भाग म्हणून त्यांच्या समर्पित स्वच्छता आणि शाश्वत पद्धती सुरू ठेवल्या आहेत. हे उपक्रम पर्यावरणीय उत्तरदायित्व तसेच कार्यक्षेत्रे आणि समुदायांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित करतात.
ऑक्टोबर 2022 मध्ये विशेष मोहीम 2.0 दरम्यान मंत्रालयाने केलेल्या काही कामगिरी प्रशंसनीय होत्या.मंत्रालयाने मोहिमेदरम्यान 3,023,788 चौरस फूट जागा स्वच्छ करत कामाच्या ठिकाणी स्वच्छ वातावरणासाठीची वचनबद्धता दाखवून दिली. पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूकतेच्या प्रयत्नात, 5,409.5 मेट्रिक टनांपेक्षा अधिक भंगाराची विल्हेवाट लावण्यात आली यामुळे 48.5 कोटी रुपये महसूल जमा झाला.
नवोन्मेषी उपक्रमांमध्ये , शाश्वत जमिनीच्या वापरात योगदान देत कोथागुडेम परिसर , एससीसीएल , हैदराबाद येथील जिथे भंगार टाकले जाते त्या जागेचे म्हणजेच स्क्रॅप यार्डचे रूपांतर उत्पादनक्षम पीक जमिनीत करणे याचा समावेश आहे . भंगार, विल्हेवाट लावलेल्या वस्तू, गाड्यांची चाके , पाईप आणि गाड्यांपासून सीसीएलने केलेल्या "कचरा उद्यान" च्या निर्मितीचे सर्वत्र कौतुक झाले.हा उपक्रम प्रस्तावित इको-पार्क आणि इतर कोळसा कंपन्यांच्या परिसरात विस्तार करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प असून .हा प्रकल्प 3 आर (कमी वापर (रिड्यूस -पुनर्वापर (रियुज ) - पुनर्निर्मिती (रिसायकल) ) संकल्पना आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी दृढ वचनबद्धता दर्शवत आहे.
पाठपुराव्याचे उपक्रम (जाने ते ऑगस्ट 2023):

सध्या सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याच्या प्रयत्नांमध्ये, कोळसा मंत्रालय आणि कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांच्या जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीतील कामगिरीचा समावेश आहे.:
- 6,929,401 चौरस फूट जागा स्वच्छ करण्याचा प्रभावी कार्यक्रम, स्वच्छतेचा उच्च दर्जा राखणे.
- 10,266 मेट्रिक टनांहून अधिक भंगाराची जबाबदारीने विल्हेवाट लावली, परिणामी 70 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला.
- फलक , संदेश प्रदर्शन, पथनाट्य , परिसंवाद आणि समुपदेशन सत्रांसह स्वच्छतेसाठी व्यापक जनजागृती मोहीम.
- पावसाचे पाणी साठवण्यासाठी "पुनर्भरण विहिरी" बांधणे, जलसंधारणाच्या प्रयत्नांना हातभार लावणे.
- एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा (एसयूपी) वापर रोखण्यासाठी जनजागृती करणे आणि पर्यावरणस्नेही तागाच्या /कापडी पिशव्या वितरित करणे
- थाई मूगाम्बीगाई मंदिर, ब्लॉक-8 जवळ सुमारे 108,900 चौरस फूट जमीन स्वच्छ करून घनदाट झाडी आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि हरित पट्टा विकासासाठी पुनर्प्रयोजन करत कचरा क्षेपण भूमीचे हरित पट्ट्यात रूपांतर करणे
- पार्किंग, रेकॉर्ड रूम, बसण्याची जागा, शौचालये बांधणी , बागकाम, वृक्षारोपण आणि खाण प्रकल्पांचा विस्तार यासह अनेक कारणांसाठी मोकळ्या जागेचा वापर करणे.
- "स्वच्छता पंधरवडा 2023" या बोधचिन्हासह मंत्रालयाच्या सर्व विभागांमध्ये हवा शुद्ध करणारी लहान रोपे लावून कामाच्या ठिकाणचे वातावरण सुधारणे.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1957093)