शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रलंबित बाबींचा निपटारा आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहीमेचा (SCDPM) दुसरा टप्पा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये धडाक्यात सुरु


देशभरात 1,051 स्वच्छता मोहिमा यशस्वीपणे राबवल्या गेल्या, 27,162 चौरस फूट जागा मोकळी झाली, 25,846 सार्वजनिक तक्रारी आणि अपीलांचे निवारण झाले, 4,750 फायली निकाली काढल्या आणि डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत भंगार विल्हेवाटीतून 25,69,693/- रुपये महसूल प्राप्त झाला.

प्रविष्टि तिथि: 13 SEP 2023 9:00AM by PIB Mumbai

प्रलंबित बाबींचा निपटारा आणि स्वच्छतेसाठी विशेष मोहीमेचा (SCDPM) दुसरा टप्पा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये धडाक्यात सुरु आहे.

प्रलंबितता कमी करणे, स्वच्छतेला संस्थात्मक रुप देणे, अंतर्गत देखरेख यंत्रणा मजबूत करणे, अधिकाऱ्यांना नोंदींच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे, नोंदींचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी, दस्तावेजातल्या प्रत्यक्ष नोंदींचे डिजीटलीकरण करणे आणि सर्व मंत्रालये/विभागांना www.pgportal.gov.in/scdpm या एकाच डिजिटल मंचावर आणणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत.

उपरोक्त कालावधीत, 11000 प्रत्यक्ष फायलींचे पुनरावलोकन केले गेले आणि 864 फाईल्स निकाली काढल्या, 61380 सार्वजनिक तक्रारी आणि अपीलांचे निराकरण करण्यात आले, 35 स्वच्छता मोहीमा राबवण्यात आल्या, 5054 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि भंगार विल्हेवाटीतून 24,49,293/- रुपये महसूल जमा झाला.

***

Jaydevi PS/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1956815) आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu