सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा
प्रविष्टि तिथि:
12 SEP 2023 6:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
वर्ष 1996 पासून, 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओथेरपी दिवस (जागतिक पीटी-भौतिकोपचार दिवस) म्हणून घोषित करण्यात आला आहे, हा दिवस 1951 मध्ये या व्यवसायाच्या प्रारंभाचा सन्मान म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णांची शारीरिक हालचाल निरोगी माणसाप्रमाणे व्हावी, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटणाऱ्या सर्व फिजिओथेरपिस्ट आणि त्यांनी प्रदान केलेल्या सेवांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आहे. या वर्षीच्या जागतिक फिजिओथेरपी दिवसाच्या केंद्रस्थानी संधिवात संकल्पना आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPwD) हा देशातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्व विकास कार्यक्रमांकडे लक्ष देणारा मुख्य विभाग आहे. फिजिओथेरपिस्टच्या महत्त्वाविषयी जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून विभागाने संलग्न संस्थांमार्फत देशभरातील 60 हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा केला.
जागतिक फिजिओथेरपी दिवसानिमित्त देशभरात आयोजित उपक्रमांमध्ये - जागरूकता कार्यक्रम, फिजिओथेरपी सत्रे, योग आणि शरीर व मन ताजेतवाने करणारे उपक्रम, चर्चासत्रे व वेबिनार, पथनाट्य आणि शारीरिक चाचणी यांचा समावेश होता.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1956710)
आगंतुक पटल : 199