जलशक्ती मंत्रालय
विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने 248 स्वच्छता मोहिमा राबवत 5900 चौ. फूट जागा मोकळी केली आणि 17.5 लाखांहून अधिक महसूल निर्मिती केली
Posted On:
12 SEP 2023 12:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2023
केंद्र सरकारच्या सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेवर मुख्य भर देऊन नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत, स्वच्छता, नियम व कार्यपद्धतींचे पुनरावलोकन आणि सुलभीकरण, अभिलेख व्यवस्था प्रणालीचा आढावा, जागेचा उत्पादक वापर, प्रसन्न कार्यस्थळासाठी टाकाऊ साहित्याची विल्हेवाट लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने अनेक शहरांमध्ये विविध उपक्रम राबवून विशेष मोहीम खऱ्या अर्थाने हाती घेतली आहे. मोहिमेशी संबंधित उपक्रमांच्या प्रगतीबाबत सचिव स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेण्यात आल्या आणि प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि मोहिमेचे यश सुनिश्चित करण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
अनेक शहरांमधील विभाग आणि त्यांच्या संस्थांनी केलेले काम दर्शवणारी माहिती, छायाचित्रे, चित्रफिती, समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली जात आहेत. मोहिमेअंतर्गत सर्वोत्तम पद्धती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केल्या जातात. विभागाअंतर्गत असलेल्या वाप्कोस (जल आणि वीज सल्लागार सेवा [भारत] लिमिटेड) या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाने ही मोहीम अत्यंत उत्साहात हाती घेतली आहे. भंगार ओळखणे, निकाली काढणे आणि लिलाव करणे, नको असलेल्या फायली काढून टाकणे यासाठी विशेष उपक्रम राबवले गेले. विभागाची अधीनस्थ संस्था फरक्का बॅरेज प्रकल्पने आपल्या प्रशासकीय इमारतीजवळ, तणांनी भरलेल्या जमिनीचा एक विस्तीर्ण पडीक भाग, एका सुंदर रमणीय स्थळात रूपांतरित केला. या स्वच्छता मोहिमेपूर्वी आणि स्वच्छता मोहिमेनंतर काढलेली छायाचित्रे जागरूकता वाढवण्याच्या सर्वोत्तम पद्धती म्हणून सर्वांसाठी उपयुक्त आहेत.
निपटारा झालेल्या प्रकरणांच्या प्रगतीची स्थिती, फायलींचे पुनरावलोकन, फायलींचा निपटारा, महसूल निर्मिती आणि मोकळ्या झालेल्या जागा खालीलप्रमाणे आहेत:
Sl. No.
|
Parameters
|
Achievements
|
1
|
VIP References (Received/Disposed)
|
254/224
|
2
|
Inter-Ministerial References (Received/Disposed)
|
15/15
|
3
|
Public Grievance Appeals (Received/Disposed)
|
431/345
|
4
|
Public Grievances (Received/Disposed)
|
3974/3224
|
5
|
PMO References (Received/Disposed)
|
48/39
|
6
|
Physical files Reviewed
|
32399
|
7
|
Physical files Weeded out
|
13872
|
8
|
E-Files Reviewed
|
11111
|
9
|
E-Files Closed
|
36
|
10
|
Cleanliness Campaigns
|
248
|
11
|
Space freed (Sq ft)
|
5900
|
12
|
Revenue Generated
|
1757014/-
|
विविध विभागांनी आजूबाजूचा परिसर, नदी, तलाव आणि जलाशय स्वच्छ करण्यासाठी सर्वांगीण आणि एकात्मिक दृष्टिकोन बाळगला. या प्रकारच्या प्रयत्नांमुळे जलाशयांच्या सभोवताली स्वच्छता सुनिश्चित झाली, त्यामुळे स्वच्छता मोहिमेच्या बृहद उद्दिष्टाला चालना मिळाली.
या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने 248 स्वच्छता मोहिमा राबवत 5900 चौ. फूट जागा मोकळी करत 17.5 लाखांहून अधिक महसूल निर्मिती केली.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1956538)
Visitor Counter : 129