राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती येत्या 12 आणि 13 सप्टेंबरला गुजरात दौऱ्यावर
Posted On:
11 SEP 2023 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, येत्या 12 आणि 13 सप्टेंबर 2023 रोजी गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.
उद्या, दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी राष्ट्रपती गांधीनगर येथे पोहोचतील.
तर, परवा, 13 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते गांधीनगर इथे ‘राष्ट्रीय ई-विधान सुविधे’चे (एनईव्हीए) उद्घाटन होईल तसेच त्या गुजरात विधानसभा सदस्यांना संबोधित करतील. त्याच दिवशी, गांधीनगर येथील राजभवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘आयुष्मान भव’ या उपक्रमाची दूरदृश्य प्रणालीद्वारे सुरुवात करतील.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956488)