दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्रामीण भागात फायबर टु द होम कनेक्शन देणाऱ्या उत्कृष्ट इंटरनेट सेवा प्रदात्यांना मान्यता देण्यासाठीची योजना
Posted On:
11 SEP 2023 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2023
डिजिटल समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी, दूरसंचार विभागाने एक योजना सुरू केली असून त्याद्वारे, ग्रामीण भागात फायबर टु द होम (एफटीटीएच) ब्रॉड बॅन्ड सेवेचा विस्तार करण्यासाठीच्या असाधारण प्रयत्नांसाठी इंटरनेट सेवा प्रदात्यांना (आयएसपी) मान्यता दिली जाणार आहे .
योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
या योजनेअंतर्गत, दूरसंचार विभागाने नऊ इंटरनेट सेवा प्रदाते निश्चित केले असून, अ, ब आणि क अशा तीन श्रेणीत प्रत्येकी तीन प्रदाते असतील. ज्यांनी, ग्रामीण भागात, एका वर्षात जास्तीत जास्त फायबर टु द होम जोडण्या दिल्या आहेत, अशा प्रदात्यांमधून या नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.
या मान्यताप्राप्त प्रदात्यांना, प्रमाणपत्र आणि आयएसपी चे नाव दूरसंचार विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. एका वर्षासाठी म्हणजेच एप्रिल ते मार्च या काळासाठी ही मान्यता असेल. पहिली मान्यता एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या काळासाठी असेल.
प्रत्येक श्रेणीसाठी किमान नेट जोडणीचे निकष खालीलप्रमाणे असतील:
श्रेणी अ : या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 50,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.
श्रेणी ब: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 10,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित आहे.
श्रेणी क: या श्रेणीतील आयएसपी ने ग्रामीण फायबर टु द होम जोडण्याअंतर्गत,किमान 2,000 नेट जोडण्या देणे अपेक्षित असेल.
या उपक्रमातून, केंद्र सरकारची ग्रामीण भागात डिजिटल उपलब्धता आणि कनेक्टीव्हिटी वाढवण्याविषयीची कटिबद्धता दिसून येते. यातून ग्रामीण भागाचा सामाजिक आर्थिक विकास आणि देशाच्या सर्वसमावेशक वृद्धीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
योजनेविषयी अधिक माहितीसाठी, कृपया दूरसंचार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://dot.gov.in/data-services/2574 ला भेट द्या.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1956402)