विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एएफएमसी ,पुणे च्या वर्षभर चाललेल्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी एएफएमसी, पुणे च्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) चॅप्टरचे केले उद्‌घाटन


"वैद्यकीय क्षेत्रातील उदयोन्मुख कल" यावरील एपीआय-एएफएमएस कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) च्या पहिल्या वार्षिक परिषदेचे डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 05 SEP 2023 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 सप्‍टेंबर 2023 

 

सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय  (एएफएमसी ), पुणे च्या वर्षभर चाललेल्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा एक भाग म्हणून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  डॉ जितेंद्र सिंह यांनी एएफएमसी , पुणे च्या असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय ) चॅप्टरचा प्रारंभ केला तसेच "वैद्यकीय क्षेत्रातील उदयोन्मुख कल " यावरील एपीआय-एएफएमएस कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) च्या पहिल्या वार्षिक परिषदेचे उदघाटनही केले.

एएफएमसी, पुणे ही एम्स, दिल्ली अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्र सरकारची वैद्यकीय शिक्षणाची पहिली संस्था होती असे सांगत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की स्वतंत्र एएफएमसीची कल्पना अन्य  कोणाकडूनही नव्हे तर खुद्द डॉ बीसी रॉय यांनी मांडली होती ज्यांना असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय ) या संस्थेला मोठे करण्याचे श्रेयही जाते.

“सामायिक  वारसा म्हणून, एपीआय  आणि एएफएमसीच्या एकत्र येण्याला देखील एक ऐतिहासिक मूल्य आहे आणि पहिल्या पिढीतील डॉक्टर बीसी रॉय यांना ही उचित  मानवंदना आहे,” असे ते म्हणाले.

परिषदेतील उद्घाटनपर भाषणात डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, कप्या-कप्यामध्ये  काम करण्याचे युग आता संपले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील  नऊ वर्षांच्या काळात  मंत्रालये आणि विभागांसह विविध संघटना, विशेषत: आरोग्य सेवा क्षेत्रातील उच्च आणि नैपुण्य  शिक्षण देणाऱ्या संस्था आणि उद्योग,यांसारख्या सरकारच्या विविध संस्थांचे एकत्रीकरण  करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले  आहेत.

स्वतः एक प्रतिष्ठित मधुमेह तज्ञ आणि वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, निदान आणि उपचारात्मक वैद्यकीय शास्त्राच्या नवीन साधनांसाठी इष्टतम परिणाम साध्य करण्यासाठी समग्र आणि "संपूर्ण विज्ञान" दृष्टिकोन आवश्यक आहे.

गेल्या सुमारे पन्नास वर्षात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या  संपूर्ण रोगाच्या निदान  तसेच उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक पद्धतींमध्ये आता आमूलाग्र बदल झाला आहे असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पुण्यातील सशस्त्र दल  वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या एका छोटेखानी  समारंभात जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस गोखले आणि एएफएमएसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल दलजीत सिंग यांनी  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

“जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांवर आणि घातक कर्करोगासारख्या आजारांवर परिणामकारक अशा जीनोमिक्स सारख्या क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन सुरू करण्यात या सामंजस्य करारामुळे मदत होईल” असे ते म्हणाले.

सहकार्यात्मक  संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच्या आंतर-मंत्रालयीन सहकार्यावरील या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी जैव तंत्रज्ञान विभाग आणि एएफएमसी  एकत्र आल्याबद्दल अभिनंदन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की,सैन्यातील जवानांचे  आरोग्य, सुरक्षा आणि कामगिरी सुनिश्चित करण्यात बायोटेक ऍप्लिकेशन्स वैविध्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहेत.

"जैव तंत्रज्ञान विभागाने जैव-वैद्यकीय  क्षेत्रात विशेषत: प्रगत निदान, उपचार पद्धती आणि लसींच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि आपल्या आरोग्य यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी ते अत्याधुनिक संशोधन करत आहेत ," असे ते म्हणाले.

“अमृत काळातील अर्थव्यवस्थेसाठी तसेच भारताला जगातील आघाडीचे राष्ट्र बनवण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञान ही गुरुकिल्ली ठरेल. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या 9 वर्षात वेगाने वाढ झाली आहे आणि आता भारताचा उल्लेख  जगातील अव्वल 12 जैवतंत्रज्ञान देशांमध्ये केला  जात आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955006) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi