संरक्षण मंत्रालय
भारताची ज्ञान परंपरा स्वातंत्र्य, बंधुता आणि जागतिक शांतता या तत्त्वांचा पुरस्कार करणारी असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
05 SEP 2023 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2023
भारतीय ज्ञान परंपरा ही जगातील सर्वात जुनी परंपरा असून ती स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जागतिक शांतता या तत्त्वांचा पुरस्कार करणारी असल्याचे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त 05 सप्टेंबर 2023 रोजी दिल्ली विद्यापीठात आयोजित 'वेदांमध्ये मांडलेली भारतीय ज्ञान परंपरा आणि सर्वोत्तम जीवन मूल्ये' या विषयावर व्याख्यान देताना संरक्षण मंत्री बोलत होते.

वेदांमध्ये हवामान बदलासह जगासमोरील अनेक आव्हानांवर उपाय असल्याचे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. निसर्गाची उपासना करण्यावर आणि पर्यावरण संवर्धन आणि वनीकरण यासारख्या पद्धतींवर वेदांमध्ये भर देण्यात आला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "वेदांचा सर्वात प्रमुख पैलू म्हणजे त्यांची दीर्घकालीनता, म्हणजेच सनातन, मात्र एक वर्ग आहे जो वेद आणि त्याच्या मूल्यांवर हल्ला करत आहे, मात्र असे प्रयत्न निरर्थक ठरतील ”, असे ते म्हणाले.
वैदिक काळ हा महिलांच्या सक्षमीकरणाचा काळ होता कारण स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच अधिकार होते. वैदिक काळात ज्यांनी भारतीय ज्ञान परंपरेत योगदान दिले आहे अशा महिलांची अनेक उदाहरणे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ब्रिटीश वसाहतवादी काळात लोकांच्या सामाजिक प्रबोधनामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेल्या योगदानाबद्दलही राजनाथ सिंह यांनी भाष्य केले.
माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्याकरण्यात येत असलेल्या शिक्षक दिनानिमित्त संरक्षणमंत्र्यांनी त्यांचे स्मरण केले. राजकारणा व्यतिरिक्त डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षण आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे,असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
* * *
N.Chitale/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1954989)
अभ्यागत कक्ष : 224