रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची आढावा बैठक
आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी, लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सेवांना नव्या उंचीवर नेण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु : नितीन गडकरी
Posted On:
04 SEP 2023 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2023
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री जनरल (डॉ) व्ही के सिंह (निवृत्त) देखील उपस्थित होते.
सचिव अनुराग जैन, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद यांच्यासह देशभरातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय , भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादितचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी गडकरी यांनी 'बांधा -वापरा -हस्तांतरण' (बीओटी) प्रारूपाला असलेला वाव, याबाबत विस्तृत चर्चा केली, हे मॉडेल आर्थिक उत्पादकता वाढवू शकते आणि विभागाला अधिक प्रकल्प हाती घेण्यास सक्षम करू शकते. नियमित गुणवत्ता निरीक्षण आणि चालू प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या महत्त्व यावर त्यांनी भर दिला.
आपल्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी, लॉजिस्टिक खर्च कमी करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक सेवांना नव्या उंचीवर नेण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरु आहेत, असे या बैठकीला संबोधित करताना गडकरी यांनी सांगितले.
'आत्मनिर्भर भारत' आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करताना, लॉजिस्टिक खर्चात कपात करण्याची गरज हा एक महत्त्वाचा पैलू आहे. हे साध्य करण्यासाठी उत्कृष्ट द्रुतगती महामार्ग तयार करणे याला सर्वोच्च प्राधान्य आहे, असे गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी सर्व हितसंबंधितांमध्ये सहकार्य, समन्वय आणि संवादावर भर दिला. उत्कृष्ट फलनिष्पत्तीसाठी आर्थिक लेखापरीक्षणासोबत कामगिरी लेखापरीक्षण अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
* * *
S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1954632)
Visitor Counter : 158