कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने फिक्की, भारतीय उद्योग महासंघ आणि पीएचडीसीसीआययांच्यासह भागीदारीत आज “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऍग्रीटेक स्टार्टअप्सची क्षमता खुली करणे” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे केले आयोजन

Posted On: 31 AUG 2023 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्ट 2023

 

भारतातील कृषी स्टार्टअप्ससाठी सर्वसमावेशक सहाय्य पुरवणाऱ्या प्रणालींवर चर्चा  आणि निवड करणे हे या राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे ज्यामुळे  नवोन्मेष, शाश्वतता आणि नफा वाढेल तसेच हे उपाय शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होतील.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने फिक्की, भारतीय उद्योग महासंघ आणि पीएचडीसीसीआय  यांच्यासह  भागीदारीत आज “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ऍग्रीटेक स्टार्टअप्सची क्षमता खुली करणे ” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव  मनोज आहुजा तसेच मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि फिक्की, भारतीय उद्योग महासंघ आणि पीएचडीसीसीआयचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.

WhatsApp Image 2023-08-31 at 6.40.47 PM.jpeg

भारतातील कृषी स्टार्टअप्ससाठी सर्वसमावेशक सहाय्य पुरवणाऱ्या प्रणालींवर चर्चा  आणि निवड करणे हे या राष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे,ज्यामुळे नवोन्मेष, शाश्वतता आणि नफा वाढेल तसेच हे उपाय शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होतील. या परिषदेमध्ये आव्हानांवर मात करण्यासाठी, तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आणि कृषी स्टार्टअप्सना सक्षम बनवण्यासाठी तसेच  कृषी क्षेत्रावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी बाजारातील संधींचा फायदा घेण्याबाबत धोरणांवर देखील विचारविनिमय झाला.

फिक्कीने दोन विशेष  सत्रांचे आयोजन केले होते. "राज्य सरकारांच्या भागीदारीमध्ये अॅग्रीटेकसाठी सक्षम व्यवस्था उभारण्यात राज्य सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका" ही पहिल्या सत्राची संकल्पना होती. पहिल्या सत्रात राज्य पातळीवरील स्टार्ट-अप्ससमोरील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारे सक्षम व्यवस्था उभारण्यात  कशी मदत करू शकतात यावरील शिफारशी मांडण्यात आल्या.

WhatsApp Image 2023-08-31 at 6.40.49 PM.jpeg

"ऍग्रीटेकमध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सक्षम करणे: सार्वजनिक डिजिटल वस्तूंद्वारे कृषी स्टार्टअप्सपर्यंत डेटा उपलब्धता सक्षम करणे" ही दुसऱ्या सत्राची संकल्पना होती.

"शेतकऱ्यांसाठी व्यवहार्य उपायांमध्ये अभिनव संकल्पना सादर करण्यासाठी स्टार्ट-अप इनक्युबेशन व्यवस्था सशक्त करणे” या संकल्पनेअंतर्गत भारतीय उद्योग महासंघाने एक विशेष सत्र आयोजित केले.

पीएचडीसीसीआयने “शेतकऱ्यांना ऍग्रीटेक सोल्यूशन्स सहज उपलब्ध बनवण्यासाठी सामाजिक नवोन्मेष” या विषयावर एक सत्र आयोजित केले.

त्याचबरोबर, भारतीय उद्योग महासंघाने "स्टार्टअप व्यवस्था वाढीसाठी धोरणात्मक सहाय्य " या संकल्पनेअंतर्गत एक तांत्रिक सत्र देखील आयोजित केले होते.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1953873) Visitor Counter : 173


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi