संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केनियाच्या संरक्षण मंत्र्यांचे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आगमन, 29 ऑगस्ट रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी करणार चर्चा

Posted On: 28 AUG 2023 9:36AM by PIB Mumbai

भारताच्या तीन दिवसीय भेटीवर आलेले केनियाचे  संरक्षण मंत्री  एडन बेरे दुआले यांचे 28 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्ली येथे आगमन झाले. संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह 29 ऑगस्ट रोजी  त्यांच्याशी चर्चा करतील. आपल्या भारत भेटी दरम्यान केनियाचे संरक्षण मंत्री  भारतातील शिपयार्ड आणि गोवा आणि बेंगळुरू येथील संरक्षण उद्योगांना भेट देतील अशी अपेक्षा आहे.

केनियाचे संरक्षण मंत्री एडन बेरे दुआले यांचा हा पहिलाच भारत दौरा असून सप्टेंबर 2022 मध्ये केनिया मध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरची  तेथील वरिष्ठ पातळीवरील पहिलीच राजकीय भेट आहे. ही भेट म्हणजे भारत, आफ्रिकी राष्ट्रांसोबतच्या  संबंधांना देत असलेल्या महत्वाचे आणि भारत आणि केनिया यांच्यातील वाढत्या सहकार्याचे प्रतीक आहे. या माध्यमातून उभय देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी नवीन मार्ग खुले होण्याची अपेक्षा आहे.

 

*******

Jaidevi PS/Bhakti/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1952857) Visitor Counter : 165