पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामित्व योजनेला मिळाला राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार 2023
Posted On:
26 AUG 2023 1:43PM by PIB Mumbai
पंचायती राज मंत्रालयाच्या स्वामित्व (SVAMITVA ग्रामीण भागात सुधारित तंत्रज्ञानासह गावांचे सर्वेक्षण आणि मॅपिंग) योजनेला नागरिक केंद्रित सेवा प्रदान करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगाकरिता राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2023 (सुवर्ण ) पुरस्कार मिळाला आहे.
स्वामित्व पथकाने. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या एनआयसी पथकाच्या सहकार्याने केलेल्या उत्कृष्ट आणि अनुकरणीय कार्याला मिळालेला हा बहुमान आहे. तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत आहे आणि प्रशासनातील सुधारणांसह तंत्रज्ञानाचे एकात्मीकरण करण्याच्या पुढाकाराचे परिणाम दिसू लागले आहेत. स्वामित्व योजनेअंतर्गत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नागरिक-केंद्रित प्रशासन शक्य झाले असून ग्रामीण भारत आत्मनिर्भर बनवण्यासाठी व्यापक ग्राम नियोजन करण्यात मदत झाली आहे.
प्रभावी अंमलबजावणीद्वारे, स्वामित्व योजना ग्रामीण भारतासाठी एकात्मिक मालमत्ता प्रमाणीकरण तोडगा प्रदान करण्यात, ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची आर्थिक स्थैर्य सुधारण्यात आणि ग्रामीण भारतातील जीवन बदलण्यात यशस्वी ठरली आहे.
***
S.Thakur/S.Kakde/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952446)
Visitor Counter : 190