कोळसा मंत्रालय

24.7% ची वाढ नोंदवून ,  88.01 मेट्रिक टन एकूण कोळसा साठा


चालू आर्थिक वर्षात एकत्रित कोळसा उत्पादनात 10.52% ची उल्लेखनीय वाढ

Posted On: 25 AUG 2023 3:15PM by PIB Mumbai

 

ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करून आणि कोळसा उत्पादन वाढवून कोळसा मंत्रालय 'आत्मनिर्भर भारत' दृष्टिकोनाचा पाठपुरावा करत उल्लेखनीय प्रगती करत आहे. मंत्रालयाने ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवणारे महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत.

23.08.23 रोजी खाणी, औष्णिक उूर्जा प्रकल्प प्रणाली (TPPs) (DCB) आणि वाहतूक इत्यादींमध्ये एकूण कोळशाच्या साठ्याची स्थिती 88.01मेट्रीक टनावर पोहोचली.   गेल्यावर्षी दिनांक- 23.08.22 रोजी 70.61 मेट्रिक टन कोळसा साठा होता, त्याच्या तुलनेत यंदा 24.7% ची लक्षणीय वाढ दर्शवते.

एकूणच, 23.08.2023 पर्यंत 340.31 मेट्रिक टन उत्पादनासह, आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकत्रित कोळसा उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे, जी मागील वर्षाच्या 23.08.23 पर्यंतच्या 307.92 मेट्रिक टनाच्या तुलनेत 10.52% ची प्रभावी वाढ दर्शवते.

कोळसा मंत्रालय देशांतर्गत कोळसा उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म धोरणात्मक नियोजन आणि कार्यक्षम अंमलबजावणीद्वारे कोळसा क्षेत्रातील शाश्वत वाढीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. देशाची वाढती ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी ऊर्जा क्षेत्राला बळकटी देणे हा या प्रयत्नांचा उद्देश आहे.

***

S.Bedekar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952274) Visitor Counter : 129