पोलाद मंत्रालय
हॉट मेटलचे उत्पादन सुरू झाल्याच्या 9 दिवसांनंतर नगरनार स्टील प्लांटने प्रथमच हॉट रोल्ड कॉइल निर्मिती करुन रचला इतिहास
अंदाजे 24000 कोटी रुपये खर्चून 3 दशलक्ष टन वार्षिक क्षमतेच्या पोलाद प्रकल्पाची बांधणी
Posted On:
25 AUG 2023 10:59AM by PIB Mumbai
नगरनार स्टील प्लांटने काल हॉट मेटलच्या उत्पादनाच्या केवळ 9 दिवसांनंतर एचआर (हॉट रोल्ड) कॉइलचे अंतिम उत्पादन तयार करण्याचा विक्रम नोंदवला आहे. पोलाद क्षेत्रात आजवर हे उत्पादन घेणे अशक्य समजले जात होते. खाण क्षेत्रातील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या कंपनीला स्टील बनवण्याचा पूर्वीचा कसलाही अनुभव नाही, त्यामुळे एनएमडीसी (NMDC) च्या या उत्पादनची गणना विक्रमाच्या यादीत केली जात आहे.
“राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ आता भारतीय पोलाद निर्मात्यांच्या प्रतिष्ठित गटात सामील झाले. बस्तरचा स्थानिक समुदाय गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होता त्याची ही पूर्तता आहे.”, असे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अमिताभ मुखर्जी यांनी नमूद केले. हॉट झोनमध्ये तीन महत्वपूर्ण युनिट्स - ब्लास्ट फर्नेस, स्टील मेल्टिंग शॉप आणि मिल्स (थिन स्लॅब कॅस्टर - हॉट स्ट्रिप मिल) इतक्या कमी कालावधीत सुरू करणे ही एक दुर्मिळ कामगिरी आहे, असे मत या उद्योगातील दिग्गजांनी नोंदवले आहे.
नगरनार स्टील प्लांट
3 दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा पोलाद प्रकल्प अंदाजे 24,000 कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. हा प्रकल्प हॉट रोल्ड बाजारामध्ये त्याच्या उच्च दर्जाच्या हॉट रोल्ड (HR) स्टीलच्या भांडारासह आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा प्रकल्प सर्वात आधुनिक मिलसारख्या तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक प्रमुख उपभोगी क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करेल. लोहखनिज पुरवठा जोडणीमुळे नगरनार स्टील प्लांटचा स्पर्धात्मक फायदा नगरनार पासून जेमतेम 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बायलादिला खाणीलाही होणार आहे.
देशांतर्गत पोलाद उद्योग याला अभूतपूर्व यश मानत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खाण कंपनीने उभारलेला एकमेव पोलाद कारखाना म्हणून नगरनार स्टील प्लांटला वेगळेपण लाभले आहे. 15 ऑगस्ट रोजी हॉट मेटलचे उत्पादन सुरू झाल्यानंतर 9 दिवसांनी, काल पहिल्या हॉट रोल्ड कॉइलच्या निर्मितीसह नगरनार स्टील प्लांटने आणखी एक विक्रम केला आहे, असे या उद्योगातील दिग्गजांना वाटते.
सामान्यत: ब्लास्ट फर्नेसचे कार्य सुरळीत होण्यासाठी काही आठवडे लागतात, त्यानंतरच स्टील मेल्टिंग शॉपच्या कामकाजाबरोबर ब्लास्ट फर्नेस उत्पादनाचा समन्वय साधला जातो.
काल एचआर कॉइलचे उत्पादन सुरू झाल्यानंतर या उत्पादनाचे लवकरात लवकर व्यावसायिकीकरण होईल हे सुनिश्चित करण्यासाठी हा कारखाना आता उत्पादन प्रक्रियेच्या स्थिरीकरणात गुंतलेला आहे.
***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1952064)
Visitor Counter : 155