राष्ट्रपती कार्यालय
चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरचे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रोचे अभिनंदन केले
Posted On:
23 AUG 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2023
विक्रम लँडरच्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगचे थेट प्रक्षेपण पाहिल्यानंतर,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि चांद्रयान-3 मोहिमेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन केले आहे.
आपल्या संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “असे काही दिवस असतात जेव्हा इतिहास घडतो. आज, चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या उतरल्यामुळे, आपल्या शास्त्रज्ञांनी केवळ इतिहासच नव्हे, तर भूगोलाच्या संकल्पनेचीही पुनर्निर्मिती केली आहे! हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रसंग आहे. या अविस्मरणीय घटनेचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. इस्त्रो आणि या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे मी अभिनंदन करते, आणि पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा देते. चांद्रयानचे यश हे संपूर्ण मानवजातीचे मोठे यश आहे, असे मला वाटते. भारताने मानवतेच्या सेवेसाठी आधुनिक विज्ञानाबरोबरच आपल्या समृद्ध पारंपरिक ज्ञानाच्या पुंजीचा कसा वापर केला आहे, याचे हे उदाहरण आहे.”
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1951551)
Visitor Counter : 152