राष्ट्रपती कार्यालय

गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 23 AUG 2023 12:01PM by PIB Mumbai

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 ऑगस्ट, 2023) राजभवन, गोवा येथे गोवा विद्यापीठाच्या 34 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
आजच्या जगात तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. गोवा विद्यापीठ नवोन्मेषला चालना देत आहे, हे जाणून घेत त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि डेटा विज्ञान सारख्या क्षेत्रात जागतिक दर्जाची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे यावर त्यांनी  भर दिला. गोवा विद्यापीठ उच्च शिक्षण संचालनालय, गोवा सरकारच्या सहकार्याने 'समग्र शिक्षण आणि आभासी अभिमुखतेसाठी डिजिटल एकात्मिक प्रणाली '’ हा कार्यक्रम राबवत आहे 
याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
गोवा विद्यापीठाच्या परिसरात विविध विभागांचे एकत्रीकरण करून आंतरविद्याशाखीय अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध 
विभाग स्थापन करण्यात आले  आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी गोवा विद्यापीठाची प्रशंसा केली.  आणि  या विद्यापीठात शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषाचे  केंद्र बनण्याची अफाट क्षमता आहे, असे त्या म्हणाल्या.
गोवा विद्यापीठाने 'उन्नत भारत अभियान' अंतर्गत पाच गावे दत्तक घे
तली आहेत त्याविषयी  राष्ट्रपतींनी  आनंद व्यक्त केला . या अभियानाअंतर्गत या गावांमध्ये शाश्वतता मॉडेलचा अवलंब करून शिंपले आणि मशरूमचे उत्पादन घेतले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समावेशन  आणि पर्यावरण संतुलनाबाबत जागरूकता निर्माण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी  गोवा विद्यापीठाच्या चमूचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की,  दीक्षांत समारंभ हा तुमच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. तुम्ही  मिळविलेल्या पदव्या तुम्हाला रोजगार मिळवण्यास किंवा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतील मात्र  एक गुण जो तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेऊ शकते तो  म्हणजे कधीही हार न मानणे. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे यावर त्यांनी भर दिला. एक निरंतर   शिकणारा व्यक्ती संधींचा फायदा घेऊ शकतो तसेच जीवनातील आव्हानांवर मात करू शकतो. आजची तरुणाई 'संकल्प काळ 'मध्ये विकसित भारत घडवेल असे सांगत भारताला अधिक समृद्धीकडे नेण्याचे स्वप्न ते पूर्ण करतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.


राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

JaydeviPS/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951353) Visitor Counter : 150