कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

राष्ट्रीय ई-प्रशासन सेवा अंमलबजावणी मूल्यांकन – NeSDA ची पाचवी आवृत्ती- राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा मासिक अहवाल प्रकाशित

Posted On: 21 AUG 2023 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑगस्ट 2023

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने राष्ट्रीय ई-प्रशासन सेवा अंमलबजावणी मूल्यांकन अहवालाची (NeSDA) पाचवी आवृत्ती -राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठीचा मासिक अहवाल” प्रकाशित केली आहे. ह्या अहवालात, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात दिल्या जाणाऱ्या ई-सेवांची अंमलबजावणी कशाप्रकारे होत आहे, याची सद्यस्थिती देण्यात आली आहे.

जुलै महिन्यांतील मासिक अहवालात ई-सेवा, अनिवार्य ई-सेवा (एनईएसडीए 2021 अनुसार) यांच्या सद्यस्थितीचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच, देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सुरू असलेल्या सर्वोत्तम पद्धती अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तसेच यात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकल एकात्मिक सेवा अंमलबजावणी पोर्टलच्या माध्यमातून होणाऱ्या अंमलबजावणीबाबत माहिती नमूद करण्यात आली आहे. त्याशिवाय, या अहवालात शिक्षण क्षेत्राअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या ई-सेवांचे अधिक सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.

जुलै 2023 साठीचा अहवाल प्रकाशित झाला असून तो  

https://darpg.gov.in/sites/default/files/NeSDA_July.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.

जुलै 2023 महिन्यासाठीच्या अहवालातील ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

ई-सेवा

  • 13,867 ई-सेवा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरविल्या गेल्या आहेत, यात जूनच्या अहवालापेक्षा 6.3% (816) सेवांची वाढ झाली आहे.

शिक्षण क्षेत्रासाठीच्या  ई-सेवा

  • शिक्षण क्षेत्रासाठी 911 ई-सेवा आता सुरू करण्यात आल्या आहेत.
  • मध्य प्रदेश सरकार शिक्षण क्षेत्रात सर्वाधिक ई-सेवा पुरवते  (122),
  • शिक्षण क्षेत्रांतर्गत ओळखल्या गेलेल्या 25 प्रकारच्या वेगळ्या ई-सेवांपैकी, कर्नाटक (21) ई-सेवांचे जास्तीत जास्त प्रकार प्रदान करते.
  • सर्वोत्तम पद्धती

गुजरात सरकारने जी-शाळा (गुजरात स्टूडेंट्स हॉलिस्टिक अड़ापटीव्ह लर्निंग अॅप)  विकसित केले आहे जे पहिली ते बारावी इयत्तेसाठी ई-सामग्रीसह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS)वर आधारित आहे.

वर नमूद केलेले 06/08/2023 पर्यंतचे ई-सेवांचे आकडे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी NeSDA – वे फॉरवर्ड डॅशबोर्डवर अपलोड केले आहेत. विभागाने नमूद केलेल्या ई-सेवांचे विविध शैक्षणिक उप-संकल्पनांमध्ये वर्गीकरण केले आहे.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950925) Visitor Counter : 97


Read this release in: Telugu , Urdu , English , Hindi