अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीडीटीने  नियोक्ताद्वारा प्रदान केलेल्या निवासी व्यवस्थेसंदर्भात अनुलाभ मूल्य निश्चित करण्यासाठी केले नियम अधिसूचित

Posted On: 19 AUG 2023 8:44PM by PIB Mumbai

 

वित्त कायदा, 2023 अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या नियोक्त्याने विनाभाडे तत्त्वावर किंवा सवलतीच्या दरात पुरवलेल्या निवासाच्या मूल्याच्या संदर्भात अनुलाभ ची गणना करण्याच्या हेतूने सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, सीबीडीटी अर्थात केंद्रीय  प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर  नियम, 1961 च्या नियम 3 मध्ये सुधारणा केली आहे.

शहरे आणि लोकसंख्येचे वर्गीकरण व  मर्यादा आता 2001 च्या जनगणनेऐवजी 2011 च्या जनगणनेवर आधारित आहेत. लोकसंख्येची सुधारित मर्यादा 25 लाखाऐवजी 40 लाख आणि 10 लाखांच्या ऐवजी 15 लाख आहे. सुधारित नियमात पगाराचे पूर्वीचे  15%, 10% आणि 7.5% हे अनुलाभ दर कमी करून आता  पगाराच्या अनुक्रमे 10%, 7.5% आणि 5% करण्यात आले आहेत. त्याचा सारांश खालीलप्रमाणे  :

Previous Categorisation and Rates

New Categorisation and Rates

Population

Perquisite Rate

Population

Perquisite Rate

More than 25 lakh

15%

More than 40 lakh

10%

Between 10 lakh and 25 lakh

10%

Between 15 lakh and 40 lakh

7.5%

Less than 10 lakh

7.5%

Less than 15 lakh

5%

 

मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ कर्मचारी राहत असलेल्या त्याच निवासस्थानाच्या वाजवी कर परिणामाची गणना करण्यासाठीचे नियमदेखील अधिक तर्कसंगत केले गेले आहेत.

अधिसूचना क्रमांक 65/2023 दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी प्रकाशित झाली आहे आणि ती  https://egazette.nic.in.   वर उपलब्ध आहे.

***

M.Pange/S.Kakade/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950530) Visitor Counter : 211


Read this release in: English , Urdu , Hindi