युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाराणसी येथे आयोजित वाय 20 शिखर परिषदेत तिसऱ्या दिवशी ‘समावेशक शासनाच्या माध्यमातून अमृत पिढीचे सक्षमीकरण’ या विषयावरील सत्राचे आयोजन

Posted On: 19 AUG 2023 7:15PM by PIB Mumbai

 

वाराणसी येथे वाय 20 शिखर परिषदेत  तिसऱ्या दिवशी समावेशक शासनाच्या माध्यामातून अमृत पिढीचे सक्षमीकरणया विषयावरील सत्राचे आयोजन करण्यात आले.  MyGov India च्या वरिष्ठ व्यवस्थापक रेणू सिंह आणि संचालक आशिष खरे यांनी सूत्रसंचालन केले. भारताची प्रेरक शक्ती असणाऱ्या युवा शक्तीचे महत्त्व सांगणाऱ्या व्हिडिओने सत्राची सुरुवात झाली. यानंतर MyGov मंचाची माहिती देण्यात आली. लोकहित आणि लोककल्याण याबाबतचे प्रश्न/विषय यावर लोकांची मते जाणून घेऊन धोरण आखणीत त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी मंत्रालये आणि विविध सागरी संस्थांसोबत त्यांचा समन्वय साधणारा हा मंच असून भारत सरकारचा नागरिक सहभागिता मंच म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आहे. धोरण आखणीत  MyGov ने वेळोवेळी नागरिकांचे विचार मागवले असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. त्यापैकी काही उदाहरणे म्हणजे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, डेटा सेंटर (विदा केंद्र) धोरण, डेटा संरक्षण धोरण, राष्ट्रीय बंदरे धोरण, आयआयएम विधेयक इ. होय. मन की बात, वार्षिक बजेट, परीक्षा पे चर्चा आणि अशा अनेक उपक्रमांसाठीसुद्धा MyGov नेहमी संकल्पना मागवते.

भारताच्या जी 20 अध्यक्षपदाअंतर्गत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाने  वाराणसी शहरात 17 ते 20 ऑगस्ट, 2023 दरम्यान युवा 20 शिखर परिषद -2023 चे आयोजन केले  आहे.

या सत्रानंतर वाय 20 मसुदा अभिपत्रकावर चर्चा झाली. जी 20 देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी वाय 20 च्या खालील पाच संकल्पनांवर चर्चा आणि विचारविनिमय केला :

1. भविष्यातले कामाचे स्वरूप : चौथी औद्योगिक क्रांती, नवोन्मेष आणि 21 व्या शतकातील कौशल्ये

2. शांतता निर्मिती आणि सलोखा: युद्ध रहित युगाची सुरुवात

3. हवामान बदल आणि आपत्ती जोखीम कमी करणे: शाश्वतता ही जीवनशैली बनवणे

4. सामायिक भविष्य: लोकशाही आणि शासनातील तरुण

5. आरोग्य, कल्याण आणि क्रीडा: युवकांसाठी अजेंडा

आयोजकांची परिषददेखील यावेळी झाली. आसाममधील  गुवाहाटी येथे फेब्रुवारी 2023 मध्ये सुरू झालेल्या  युवा 20 शिखर परिषदेच्या बैठकीपासून गेल्या काही महिन्यात गवसलेल्या शिकवणुकीचे प्रतिबिंब यात दिसून आले. या परिषदेने वाय 20 मसुदा पत्राचे बीजारोपण केले आणि एक परिणामकारक दस्तऐवज तयार करण्यात आला.  यात जी 20 साठी भारताची एक पृथ्वी, एक कुटुंब एक भविष्य' ही भावना प्रतिबिंबित होत असून  वाय 20 गटांमधील परस्पर अध्ययन  आणि पाठबळ  यावर भर देण्यात आला आहे. 

***

M.Pange/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950526) Visitor Counter : 126