आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे जी- 20 अध्यक्षपद

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते “ग्लोबल इनिशीएटीव्ह ऑन डिजिटल हेल्थ – अ डब्ल्यू एच ओ मॅनेज्ड नेटवर्क” चे जागतिक आरोग्य संघटनेचे महसंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेएयासस यांच्या उपस्थितीत प्रकाशन

Posted On: 19 AUG 2023 4:17PM by PIB Mumbai

 

आज जी-20 आरोग्य कार्यकारी गटाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे, जिथे जी-20 देश केवळ त्यांच्या संदर्भित प्राधान्यासाठीच ओळखले जातात असे नाही, तर याच्या प्रकाशनासाठी देखील सर्वांनी एकत्रित काम केले आहे असे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. जी-20 आरोग्य मंत्र्यांच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या बैठकीत, आज, डिजिटल आरोग्यविषयक अभिनव प्रयोग आणि उपाययोजनांद्वारे सार्वत्रिक आरोग्य सेवा व्याप्तीला मदत करणे आणि आरोग्य सेवांच्या दर्जात सुधारणा करणे या विषयावरील बीजभाषणात ते बोलत होते. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेएयासस यांच्यासह, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि प्रा. एस पी सिंग बघेल, आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल हे देखील उपस्थित होते.

आरोग्यविषयक उभ्या मांडणीतील अभियानांनावर भर देणाऱ्या, डिजिटल आरोग्यविषयक उपाययोजनांमधे होणाऱ्या प्रगतीचे संपूर्ण जग आज साक्षीदार ठरले आहे, असे सांगत, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, हा कप्याकप्याचा दृष्टिकोन, आणि तुकड्यातुकड्यातील डिजिटल उपाययोजना, यातून आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामांचा ताण वाढला आहे. एकच काम दोनतीनदा केले जात असल्यामुळे ऊर्जा आणि वेळ विनाकारण वाया जात आहे, शिवाय, या कामात एकमेकांमध्ये परस्पर संबंधांचा अभाव आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळामुळे, एक राष्ट्रीय डिजिटल आरोग्यविषयक संरचना तयार करण्याची संधी मिळाली आहे. याचा लाभ घेऊन, आपल्या अनुभवांच्या आधारे, संरचनेच्याच आधारे, परस्पर कार्यान्वयनातून, आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठीराष्ट्रीय डिजिटल आरोग्यविषयक अभियानांचे अभिसरण -एकत्रीकरण  केले जात आहे.

याच संदर्भात, डॉ. मांडवीय यांनी, जी-20 देश, निमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर भागधारकांचे प्रयत्न आणि सहकार्याचे आभार मानले. त्यांनी एकत्रित येऊन, एक सामाईक आराखडा तयार करणे आवश्यक असल्याची गरज ओळखली, आणि त्यानुसार सर्व उपक्रमांचे एकात्मिकरण करुन, डिजिटल आरोग्य क्षेत्रात होत असलेले प्रयत्न आणि गुंतवणूक एकत्रित करण्याचे आणि त्यातून एक सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचे निश्चित केले. त्यातूनच, ग्लोबल इनिशीएटीव्ह ऑन डिजिटल हेल्थ अ डब्ल्यू एच ओ मॅनेज्ड नेटवर्क म्हणजेच, डिजिटल आरोग्याबाबत एक जागतिक- आरोग्य संघटनेद्वारे संचालित उपक्रम सुरू केला आहे.

राष्ट्रीय स्तरावर नवनवीन डिजिटल आरोग्यसेवा राबविण्यात भारताने घेतलेली भरारी मालविय यांनी अधोरेखित केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, भारत, जागतिक स्तरावर डिजिटल कार्यक्रमाचा खंदा पुरस्कर्ता म्हणून काम करत आहे, हे देखील सांगितले. या विषयावर जागतिक स्तरावर हालचाली सुरु होण्यास कारण ठरलेल्या, 2018 मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या 71 व्या जागतिक आरोग्य सभेत भारताने मांडलेल्या ठरावाची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. जागतिक डिजिटल आरोग्य सहकार्य आणि कॉमनवेल्थ तांत्रिक कार्य गटाचा अध्यक्ष म्हणून भारताने महत्वाची राष्ट्रीय धोरणे राबविण्यासाठी डिजिटल आरोग्य सेवा मजबूत करण्याचे महत्व अधोरेखित केले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

डिजिटल आरोग्य संबंधी जागतिक उपक्रम (जीआयडीएच) हे प्रयत्न आणि सर्वोत्तम पद्धती यांचा मेळ घालून आरोग्यसेवेमध्ये समानतेला चालना देणारे एकात्मिक पाऊल असल्यावर डॉ. टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी भर दिला. नैतिकता, धोरण आणि प्रशासन यांना ते योग्य महत्त्व देत कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या साधनांचा समावेश करून आपल्या प्रयत्नांना बळ देईल. जागतिक आरोग्यसेवा आपण एकट्याने सुनिश्चित करू शकत नाही. जीआयडीएच कोणालाही वंचित न ठेवता आपल्या उद्दिष्टांची समावेशकता, एकात्मता आणि संरेखन सुनिश्चित करेल असे ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटना आरोग्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याप्रति वचनबद्ध आहे, असे डॉ. टेड्रोस यांनी नमूद केले. "गेल्या दोन दशकांमध्ये, टेलिमेडिसिन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा जगभरात लक्षणीय प्रभाव पडला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद आणि क्षमता गेल्या दोन दशकांमध्ये अभूतपूर्व वेगाने विस्तारली आहे. कोविड-19 दरम्यान आरोग्य सेवेत निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या काळात तंत्रज्ञानाची क्षमता आणि यशस्वी अंमलबजावणी टेलिमेडिसिन वापराच्या रूपात दिसून आली, असे  ते म्हणाले.  

डिजिटल आरोग्य संबंधी जागतिक उपक्रम भविष्यातील गुंतवणूक प्रभावी बनवण्यासाठी परस्पर उत्तरदायित्व बळकट करत पुरावे एकत्रित करेल आणि आरोग्य प्रणालींसाठी जागतिक डिजिटल आरोग्यातील अलिकडचे आणि मागील लाभ वाढवेल. जीआयडीएच हे जागतिक आरोग्य संघटना द्वारा व्यवस्थापित नेटवर्क ("नेटवर्क ऑफ नेटवर्क") असेल जे खालील चार मूलभूत स्तंभांवर लक्ष केंद्रित करून वारंवार प्रयत्न आणि "उत्पादन-केंद्रित" डिजिटल आरोग्य परिवर्तन सारख्या आव्हानांवर उपाय शोधून सर्वांपर्यंत डिजिटल आरोग्य पोहचवण्यास  प्रोत्साहन देईल:

जीआयडीएचचे प्रमुख घटक विद्यमान पुरावे, साधने आणि ज्ञानाचा लाभ उठवतील आणि पारदर्शक व सर्वसमावेशक प्रक्रियेद्वारे त्याची निर्मिती केली जाईल. या पुरावा - आधारित आणि सर्वसमावेशक सह-निर्मिती प्रक्रियेद्वारे, जीआयडीएचचे अंतिम ध्येय :

डिजिटल आरोग्य 2020-2025 वरील जागतिक धोरणाला बळ देण्यासाठी प्रयत्नांची आखणी करणे

जागतिक सर्वोत्तम पद्धती, निकष आणि मानकांना अनुरूप  मानके -आधारित आंतरपरिचालन प्रणाली  विकसित आणि मजबूत करण्यासाठी गुणवत्तापूर्ण तांत्रिक सहाय्याला समर्थन देणे ;

सरकारांना, डिजिटल आरोग्य परिवर्तनाचा प्रवास सुनिश्चित करण्यास सक्षम करु शकतील अशा गुणवत्तेची हमी देणाऱ्या डिजिटल परिवर्तन उपकरणांचा जाणीवपूर्वक वापर सुलभ करणे.

डिजिटल आरोग्य परिवर्तनाच्या दिशेने पथदर्शी आराखडा परिभाषित करत, कृती आणि उद्दिष्टांना संरेखित करण्याचा मार्ग म्हणून डिजिटल आरोग्यावरील जागतिक धोरणाला 2020 मधे सदस्य देशांनी पाठिंबा दिला होता. जागतिक धोरणात प्रस्तावित 70% अधिक कामे करण्यासाठी जीआयडीएच आपल्याला सक्षम करेल.

आरोग्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकासाठी हे मूल्य खुले करणे या विषयावरील जागतिक बँकेचा पथदर्शी अहवालही डॉ. मांडविय यांनी सत्रादरम्यान प्रकाशित केला. देशाची डिजिटल परिपक्वता किंवा वित्तीय आव्हानांची पर्वा न करता डिजिटल आरोग्य अंमलबजावणी कशी सुरू करावी, याबद्दल देशांना आत्मविश्वास देण्याचा आणि व्यावहारिक मार्गदर्शन करण्याचा या अहवालाचा हेतू आहे.

जगभरातील आरोग्यसेवा सुधारण्यात टेलिमेडिसिनने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका सौदी अरेबियाचे आरोग्य मंत्री फहाद बिन अब्दुररहमान अल-जलाजेल यांनी अधोरेखित केली. कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेमध्ये कसा उपयोग करता येईल, अशा शक्यतांचा लाभ घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आरोग्य नोंदीचे डिजिटलीकरण करण्याच्या प्रयत्नांतर्गत आरोग्य विषयक विविध माहिती (डेटाबेस) गोळा करण्याच्या त्यांच्या सुरू असलेल्या कामावर इंडोनेशियाचे आरोग्य मंत्री बुडी सादिकिन यांनी भर दिला.

सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल आरोग्य हे एक महत्त्वाचे साधन आहे असे ब्राझीलच्या आरोग्य मंत्री डॉ. निशा त्रिन्दादे यांनी अधोरेखित केले. माहिती (डेटा) संरक्षण, समानता इत्यादीसारख्या काही तत्त्वांद्वारे डिजिटल आरोग्याचे मार्गदर्शन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

एकात्मिक डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या छत्राखाली विविधगुणधर्मी प्रणालींना एकत्रित करण्यासाठी अभिसरण दृष्टिकोनाचे महत्त्व केंद्रीय आरोग्य सचिव सुधांश पंत यांनी अधोरेखित केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशनद्वारे (एबीडीएम) सर्वसमावेशक डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारण्यासाठी भारत करत असलेल्या प्रचंड प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. शोध घेत असताना पुनरावृत्ती टाळली जावी यासाठी आमचे अनुभव जगासोबत वाटून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत, असे ते म्हणाले. वाटून घेण्याचा हा दृष्टिकोन भारताच्या वसुधैव कुटुंबकम (म्हणजे संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. देशापुरतेच स्रोत आणि हिस्सा या संकल्पनेच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा हे आपल्यापैकी प्रत्येकाला देते, असे ते म्हणाले.

***

M.Pange/R.Aghor/S.Kane/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1950454) Visitor Counter : 223