श्रम आणि रोजगार मंत्रालय
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक - जुलै, 2023
Posted On:
18 AUG 2023 8:05PM by PIB Mumbai
शेतमजूर आणि ग्रामीण मजुरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाचा आकडा, (आधारभूत वर्ष: 1986-87=100) जुलै, 2023 मध्ये प्रत्येकी 19 अंकांनी वधारला आहे आणि तो अनुक्रमे 1215 (एक हजार दोनशे पंधरा) आणि 1226 (एक हजार दोनशे आणि सव्वीस) इतका झाला आहे. शेतमजूर आणि ग्रामीण मजूर यांच्या सामान्य निर्देशांकात अनुक्रमे 18.23 आणि 18.28 अंक इतकी वाढ होण्यामागे, प्रामुख्याने तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळी, दूध, मासे-ताजे/वाळवलेले, गुळ, मिरची-हिरवी/वाळवलेली, हळद, लसूण, आले, कांदा, मिश्र मसाले, वांगी, टोमॅटो, दुधी इ. अन्नधान्य उत्पादनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे प्रमुख योगदान आहे.
निर्देशांकातील वाढ राज्य निहाय बदलत असून, कृषी मजुरांच्या बाबतीत, 20 राज्यांमध्ये 1 ते 29 अंकांची वाढ नोंदवली गेली. तमिळनाडू राज्य 1420 गुणांसह निर्देशांकात अव्वल असून, सर्वात शेवटी 932 गुणांसह हिमाचल प्रदेश हे राज्य आहे.
ग्रामीण मजुरांच्या बाबतीत, 20 राज्यांमध्ये 9 ते 28 गुणांची वाढ नोंदवली गेली. 1407 गुणांसह तामिळनाडू राज्य निर्देशांकात अव्वल तर हिमाचल प्रदेश 993 गुणांसह सर्वात तळाशी आहे.
राज्यांमध्ये, कृषी मजुरांसाठीच्या ग्राहक मूल्य निर्देशांकात सर्वाधिक वाढ तामिळनाडूमध्ये (29 गुण) आणि ग्रामीण मजुरांसाठी तामिळनाडू आणि केरळमध्ये (प्रत्येकी २८ गुण) झाली. ही वाढ प्रामुख्याने डाळी, मासे ताजे/वाळवलेले, मिरची-हिरवी/वाळवलेली, आले, कांदा, वांगी, टोमॅटो, दुधी इत्यादींच्या किमतीत वाढ झाल्यामुळे होती.
शेतमजुरांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI-AL) आणि ग्रामीण मजुरांसाठीचा ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI-RL) यावर आधारित महागाईचा दर जुलै, 2023 मध्ये अनुक्रमे 7.43% आणि 7.26% इतका होता. जून 2023 मध्ये तो अनुक्रमे 6.31% आणि 6.16% इतका, तर मागील वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 6.60% & 6.82% इतका होता. त्याचप्रमाणे जुलै 2023 मध्ये अन्नधान्यावर आधारित महागाईचा दर अनुक्रमे 8.88% आणि 8.63% होता. जून 2023 मध्ये तो 7.03% and 6.70%, आणि गेल्या वर्षीच्या याच महिन्यात तो अनुक्रमे 5.38% आणि 5.44% इतका होता.
अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकाची आकडेवारी (सामान्य आणि गट निहाय):
Group
|
Agricultural Labourers
|
Rural Labourers
|
|
June, 2023
|
July, 2023
|
June, 2023
|
July, 2023
|
General Index
|
1196
|
1215
|
1207
|
1226
|
Food
|
1126
|
1152
|
1131
|
1158
|
Pan, Supari, etc.
|
1986
|
1992
|
1996
|
2002
|
Fuel & Light
|
1304
|
1304
|
1296
|
1295
|
Clothing, Bedding &Footwear
|
1255
|
1258
|
1298
|
1302
|
Miscellaneous
|
1264
|
1266
|
1269
|
1271
|
ऑगस्ट 2023 साठी CPI – AL आणि RL 20 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर होईल.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950295)
Visitor Counter : 176