ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) आणि नाफेड येत्या 20 ऑगस्टपासून (रविवार) 40 रुपये किलो दराने टोमॅटो ची विक्री करणार

Posted On: 18 AUG 2023 5:41PM by PIB Mumbai

 

घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण असल्याने ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) आणि नाफेड (NAFED) या संस्थांना 20 ऑगस्ट 2023 पासून 40 रुपये प्रति किलो या दराने टोमॅटोची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्ली-एनसीआर भागात टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू झाली आहे. आजपर्यंत 15 लाख किलोपेक्षा जास्त टोमॅटो या दोन संस्थांनी खरेदी केले होते, ज्याची देशातील प्रमुख ग्राहक केंद्रांमधून किरकोळ ग्राहकांना सातत्याने विक्री केली जात आहे. यामध्ये दिल्ली-एनसीआर, राजस्थान (जयपूर, कोटा), उत्तर प्रदेश (लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज) आणि बिहार (पाटणा, मुझफ्फरपूर, आराह, बक्सर) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) आणि नाफेड (NAFED) या संस्थांनी खरेदी केलेल्या टोमॅटोची किरकोळ किंमत सुरुवातीला  90 रुपये प्रति किलो ठरवण्यात आली होती, मात्र ग्राहकांना लाभ सुनिश्चित करण्यासाठी टोमॅटोच्या दरात झालेल्या घसरणीच्या अनुषंगाने ती आणखी कमी करण्यात आली. दिनांक 15.08.2023 रोजी टोमॅटोचे दर 50 रुपये प्रति किलो एवढे कमी करण्यात आले होते जे दिनांक 20.08.2023 पासून आणखी कमी करून 40 रुपये प्रति किलो दराने विक्री केले जाणार आहेत.

आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, ग्राहक व्यवहार विभागाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) आणि नाफेड (NAFED) या संस्थांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमधून टोमॅटोची खरेदी केली होती आणि गेल्या एका महिन्यात ज्या ठिकाणी टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झालेली आहे त्या ठिकाणच्या  ग्राहक केंद्रांमधून एकाच वेळी टोमॅटोची विक्रीही सुरू केली होती.

***

S.Patil/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950235) Visitor Counter : 116