वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक परिस्थिती प्रतिकूल असूनही जुलै 2023 मध्ये भारताच्या एकूण निर्यात अंदाजे 59.43 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंतचा टप्पा

Posted On: 14 AUG 2023 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 ऑगस्ट 2023

 

देशाची एकूण व्यापार  तूट जुलै 2022 मधील 15.24 अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून 45.22% ने सुधारून जुलै 2023 मध्ये 8.35 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे. मालाची  व्यापार तूट  जुलै 2022 मधील  25.44 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या तुलनेत 18.74% ने सुधारून जुलै 2023 मध्ये   20.67 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली आहे. जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये लोह खनिजाच्या निर्यातीत 962.82% ची लक्षणीय वाढ नोंदवली गेली आणि एप्रिल-जुलै 2022 च्या तुलनेत यात एप्रिल-जुलै 2023 दरम्यान 64.52% ची वाढ झाली आहे.

मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 13.09% आणि 37.6% ची वाढ नोंदवली गेली आहे.

मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सिरॅमिक उत्पादने आणि काचेच्या वस्तूंच्या निर्यातीत जुलै 2023 आणि एप्रिल-जुलै 2023 मध्ये अनुक्रमे 20.82% आणि 12.39% वाढ नोंदवण्यात आली आहे.

कृषी निर्यातीत दमदार वाढ झाली आहे :  जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये फळे आणि भाज्यांची निर्यात 18.94%, तेल बियाणे 32.83%, खाद्यतेल 34.24%, तांदूळ निर्यात  5.38% ने वाढली आहे 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948645) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Hindi