गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरात मधील गांधीधाम  येथे इफको नॅनो डीएपी (द्रव) संयंत्राचे  भूमिपूजन आणि पायाभरणी केली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना करून ‘सहकार से समृद्धी’ या संकल्पनेतून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे लक्ष्य ठेवले

Posted On: 12 AUG 2023 7:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरात मधील गांधीधाम  येथे इफको नॅनो डीएपी (द्रव) संयंत्राचे  भूमिपूजन आणि पायाभरणी केली.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना करून सहकार से समृद्धीया संकल्पनेतून देशातील 15कोटी शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गांधीधाम येथील आगामी प्रकल्प  इफकोच्या विद्यमान संयंत्रापेक्षा  3 दशलक्ष टन डीएपीचे उत्पादन करणाऱ्या संयंत्रापेक्षा अधिक उत्पादन करेल.  द्रवरूप  खत देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राला बहुआयामी लाभ  देणार आहे असे केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले. नॅनो डीएपी (द्रवरूप  ) च्या फवारणीमुळे जमीन प्रदूषित होणार नाही, परिणामी नैसर्गिक शेती अधिक सुलभ होईल, कृषी उत्पादनाबरोबरच जमिनीची सुपीकता वाढेल आणि जमीनीच्या संवर्धनाला चालना मिळेल.

जेव्हा खते योग्य प्रमाणात आणि योग्य दरात उपलब्ध होतात, तेव्हा शेतकरी अधिक समृद्ध होतो  असे अमित शाह म्हणाले.

पंतप्रधान मोदींचे "सहकार से समृद्धी" हे स्वप्न साकार करण्यासाठी सहकार मंत्रालयाने तीन बहुराज्यीय सहकारी संस्थांची स्थापना केली आहे आणि या तीन संस्था ही तीन उद्दिष्टे पूर्ण करतील असे  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  म्हणाले. धरणीमातेला वाचवण्यासाठी अनेक शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत, परंतु त्यांच्यासमोर दोन प्रमुख समस्या आहेत. पहिली समस्या म्हणजे प्रमाणीकरणाअभावी लोक त्यांची उत्पादने सेंद्रिय मानत नाहीत आणि दुसरी, जरी मानले तरी त्यासाठी चांगली किंमत कुणालाही  द्यावीशी वाटत नाही. आज देशात अनेक लोक आहेत ज्यांना सेंद्रिय अन्न, भाजीपाला, गहू, तांदूळ, डाळी आणि तेल चांगल्या दरात  विकत घ्यायचे आहे, परंतु त्याचे प्रमाणीकरण आणि विपणनासाठी कुठलीही  व्यवस्था नाही.  सरकारने सेंद्रिय उत्पादनांच्या विपणनासाठी बहुराज्यीय सहकारी संस्थेची स्थापना केली असून, ही संस्था जमिनीचे प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांकडून सेंद्रिय उत्पादने खरेदी करेल असे ते म्हणाले.

अमित शहा म्हणाले की, सहकार क्षेत्र हे खतांच्या उत्पादन आणि विक्रीतील देशाच्या कृषी क्रांतीचा एक मजबूत आधारस्तंभ बनले आहे आणि आज हा स्तंभ अधिक मजबूत झाला आहे.

सरकारने प्राथमिक कृषी पतसंस्थेअंतर्गत अन्नधान्यासाठी जगातील सर्वात मोठी साठवण योजना आणली आहे अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी दिली.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948227) Visitor Counter : 106