आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते ‘ईआरएमईडी संघ: डिजिटल आरोग्य परिवर्तनासाठी ग्रंथसंग्रहालयांचे सशक्तीकरण’ या संकल्पनेवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
डिजिटल मंचाच्या माध्यमातून सर्वांना वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात राष्ट्रीय एमईएलची भूमिका अत्यंत महत्त्वाची : केंद्रीय मंत्री डॉ.भारती प्रवीण पवार
Posted On:
11 AUG 2023 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम ग्रंथसंग्रहालय येथे ‘ईआरएमईडी संघ: डिजिटल आरोग्य परिवर्तनासाठी ग्रंथसंग्रहालयांचे सशक्तीकरण’ या संकल्पनेवरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.
ईआरएमईडी चा अर्थ भारताच्या वैद्यकीय मानचित्राच्या कक्षेतील सहयोगात्मक उत्कृष्टता आणि परिवर्तनीय प्रभाव तसेच वैद्यकीय समुदायाच्या वैविध्यपूर्ण माहितीविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठीची दृढ वचनबद्धता असा आहे. ईआरएमईडी संघ सुविधेचा विस्तार देशातील 74 निवडक सरकारी संस्थांपर्यंत करण्यात आला असून त्यात 14 एम्स संस्थांचा समावेश आहे आणि अगदी आयुष संशोधन महाविद्यालयांपर्यंत देखील त्याचा विस्तार करण्यात आला आहे.

एनएमएलचे महत्त्व आणि प्रभाव यांच्यावर जोर देत केंद्रीय मंत्री डॉ.भारती प्रवीण पवार म्हणाल्या की आता दुर्गम भागात राहणारे शिक्षक, संशोधन करणारे विद्यार्थी देखील एनएमएलच्या ई-स्त्रोत सुविधेचा लाभ घेत आहेत. ही ई-स्त्रोत सुविधा म्हणजे एनएमएल ची पुस्तके आणि जर्नल्स यांचा मोठा साठा एनआयसीच्या ई-ग्रंथालय या क्लाऊड सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आला असून कोणत्याही माहितीच्या शोधकर्त्याला अत्यंत सोप्या रीतीने शोधता येईल अशा प्रकारे उपलब्ध आहे. संघातील सदस्य संस्थांना ई-पुस्तके, ई-जर्नल्स, वैद्यकीय केसेस, उच्च पृथक्करण प्रतिमा यांसारखे एनएमएलचे इतर ई-स्त्रोत वैद्यकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक स्त्रोत (ईआरएमईडी)च्या माध्यमातून उपलब्ध आहेत.” ज्ञानाचा शोध घेत राहणे हे केवळ रुग्णाच्या सेवेसाठीच नव्हे तर वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी देखील लाभदायक आहे, त्या पुढे म्हणाल्या.
डॉ.भारती प्रवीण पवार यांनी यावर भर दिला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकारने गेल्या 9 वर्षांत देशातील विविध वैद्यकीय संस्था/महाविद्यालयांमध्ये जागांची संख्या वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, ज्याचा परिणाम म्हणून 2014 पूर्वी 51,348 असलेली पदवीच्या जागांची संख्या आजमितीस 1,07,948 हून अधिक झाली आहे, म्हणजेच 110% वाढली आहे. त्याचप्रमाणे, 2014 पासून, देशातील पदव्युत्तर जागांची संख्या 117 टक्क्यांनी वाढून 67,802 जागांवर पोहोचली आहे. याचा अर्थ असा आहे की, आगामी काळात, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वैद्यकीय शिक्षण सर्वांना सुलभ करण्यासाठी एनएमएल महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्या म्हणाल्या.
केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सुचवले की सर्वांसाठी प्रवेशयोग्य असलेल्या ईआरएमईडी कन्सोर्टियममध्ये अधिक वैद्यकीय ई-संसाधनांचा समावेश करावा. "अभूतपूर्व शोध, नवीन तंत्रज्ञान आणि रूग्ण सेवेतील प्रगतीमुळे वैद्यकीय जगतात सातत्याने उत्क्रांती होत आहे. या जलद बदलत्या परिस्थितीत, आजीवन शिक्षणाचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. औषध हे अचूकता आणि करुणेचे क्षेत्र आहे, जिथे व्यक्तींचे जीवन आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या ज्ञान, कौशल्य आणि नैपुण्यावर अवलंबून असते”, असेही त्यांनी सांगितले.

एनएमएल -ईआरएमईडी स्मरणिकेचे प्रकाशन देखील यावेळी झाले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एएस आणि एफए जयदीप कुमार मिश्रा, डीजीएचएस डॉ अतुल गोयल, आणि एडीजी (एमई) डॉ. बी. श्रीनिवास देखील यावेळी उपस्थित होते.
S.Patil/S.Chitnis/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1947858)